शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हॉर्न वाजविला म्हणून शेतकरी कुटुंबातील तरुणांवर जीवघेणा हल्ला; दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल 

By शेखर पानसरे | Updated: May 30, 2023 13:45 IST

पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : गाडीचा हॉर्न वाजवला. या किरकोळ कारणावरून तालुक्यातील जोर्वे येथील शेतकरी कुटुंबांतील तरुणांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार रविवारी (दि.२८) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील जोर्वे नाका परिसरात घडला होता. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने रात्री ९.३० च्या सुमारास जोर्वे येथील तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.२९) दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. यातील १४ जणांना अटक केल्याचे श्रीरामपूर उपविभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी सांगितले.

       रविवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास जोर्वे गावातील शेतकरी कुटुंबांतील सुमीत पोपट थोरात, तन्मय नानासाहेब दिघे, विजय मंजाबापू थोरात आणि एक अल्पवयीन मुलगा हे पशुखाद्याचे विक्री करून पिकअप या चारचाकी वाहनातून जोर्वे येथे जात होते. जोर्वे नाका येथे आल्यानंतर गाडीचा हॉर्न वाजवला. या किरकोळ कारणावरून त्यांना जोर्वे नाका येथील बाबू टपरी वाला, इम्रान वडेवाला, नदीम हुसेन शेख, इम्रान (युसूफ पेंटरचा मुलगा), रियाज जहीर शेख, रिक्षावाला राहीफ व सफीक चहावाला यांनी व इतर २५ ते ३० जणांनी मारहाण केली.

त्याबाबत रविंद्र नामदेव गाडेकर, गोकूळ गणपत दिघे, बाबासाहेब शिवाजी थोरात, जितेंद्र कैलास दिघे, अजय भीमाजी थोरात, गणेश बंडोपंत काकड हे संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास रविंद्र गाडेकर, गोकूळ दिघे, बाबासाहेब थोरात, जितेंद्र दिघे, अजय थोरात (सर्व रा. जोर्व, ता. संगमनेर) हे तीन दुचाकीवरून जोर्वे येथे जात असताना शंभर ते दीडशे जणांचा जमाव त्यांच्याकडे धावत आला. त्यांच्या हातात तलावर, चॉपर, फायटर, लाकडी दांडे, लोखंडी रॉड होते. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला.

जमावातील इरफान व इम्रान वडेवाला व त्यांच्याकडे काम करणारे तिघे, बाबू टपरीवाला, अकिल टपरीवाला, नदीम हुसेन, ताहीर नजीर पठाण, शाहिद वाळूवाला, मुसेफ शेख, मुज्जू, फय्यूम फिटर, राहिफ चहावाला, साफीक चहावाला, एफफू खान वाडेवाला यांनी त्यांना मारण्यास करण्यास सुरूवात केली. बेदम मारहाण करत गंभीर जखमी करण्यात आले होते. मारहाण झालेले सर्वजण पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. जखमीवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून १४ जणांना ताब्यात घेतले. अजूनही कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती