शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पार्सलसाठी 5 रुपये देणं फॅशन डिझायनरला पडलं महागात, गमावले 1.38 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 11:58 IST

वेबसाइटवर पार्सलचा ट्रॅक केल्यानंतर काही मिनिटांत, महिलेला एका अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला, ज्याने स्वतःची ओळख कुरिअर फर्मचा कर्मचारी म्हणून दिली

गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने कुरिअर डिलिव्हरी स्कॅममध्ये अडकून 1.38 लाख रुपये गमावले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, 25 वर्षीय फॅशन डिझायनर मितीक्षा शेठने पालडी येथील एका व्यक्तीकडे कपडे शिवण्यासाठी दिले होते. ती त्या पार्सलची वाट पाहत होती. ऑर्डर पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीने ती डिलिव्हरीसाठी पाठवली आहे असं सांगितलं.

2-3 दिवसांनंतरही पार्सल आले नाही, तेव्हा तिने दिलेल्या कुरिअर डिटेल्सवर ऑर्डर ट्रॅक करायला सुरुवात केली. तथापि, वेबसाइटवर पार्सल ट्रॅक केल्यानंतर काही मिनिटांत, महिलेला एका अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला, ज्याने स्वतःची ओळख कुरिअर फर्मचा कर्मचारी म्हणून दिली. त्याने सांगितले की त्याच्याकडे पार्सल आहे आणि डिलिव्हरी चार्ज भरल्यानंतर ते वितरित केले जाईल. त्याने पार्सल घेण्यासाठी पाच रुपये फी भरण्याची विनंती केली.

कॉलरने महिलेसोबत पैसे देण्यासाठी लिंकही शेअर केली. महिलेने लिंकद्वारे पाच रुपये दिले. मात्र, पैसे भरल्यानंतर तिला पुन्हा एकदा वाढीव शुल्क म्हणून 5 रुपये भरण्यास सांगण्यात आले. "दुसऱ्या व्यवहारानंतर, मला ऑनलाइन फसवणुकीचा संशय आला आणि त्यामुळे माझे बँक खाते निष्क्रिय केले. मी प्रवास करत असल्यामुळे 13 मे ते 21 मे दरम्यान माझा सेलफोन वापरला नाही" असं महिलेने म्हटलं. 

काही दिवसांनी महिलेने तिचे खाते तपासले असता तिच्या बँक बॅलन्समध्ये कमी पैसे होते. जेव्हा मी माझ्या मित्राला काही पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळले की माझ्या खात्यात पुरेसे शिल्लक नाही असं सांगितलं. महिला दुसऱ्या दिवशी बँकेत गेली. 12 मे आणि 13 मे रोजी चार व्यवहार झाले आणि तिच्या खात्यातून 1.38 लाख रुपये डेबिट झाल्याची माहिती मिळाली. तिने सायबर क्राईम हेल्पलाइनवर कॉल केला आणि  तक्रार दाखल केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम