शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट स्टॅम्प वापरून केले खोटे खरेदी खत; शासनाच्या महसुलावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 00:14 IST

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खताच्या नोंदणीसाठी आलेल्या ग्राहकांची खोटे दस्त देऊन फसवणूक झाली आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : बनावट स्टॅम्प वापरून खोटे खरेदी खत तयार करून शासनाचा कोट्यवधीचा महसूल लाटल्याची घटना उघडकीस आली आहे. अशा प्रकारे चौघांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, इतरही अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. तर हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय व्यक्तीकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. 

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खताच्या नोंदणीसाठी आलेल्या ग्राहकांची खोटे दस्त देऊन फसवणूक झाली आहे. यामध्ये शासनाच्या तिजोरीत जाणारा कोट्यवधीचा महसूल एजंटने स्वतःच्या खिशात घातला आहे. शिरवणे येथे राहणाऱ्या राजेश भावळे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी नेरुळ येथे खरेदी केलेल्या घराच्या नोंदणीसाठी कोपरखैरणे सेक्टर २ए मधील रियल इंटरप्रायजेस एजंटच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी दस्त नोंदणीसाठी ९२ हजाराची स्टॅम्प ड्युटी व २५ हजार वकिलाचे शुल्क असे त्यांच्याकडून १ लाख १७ हजार रुपये घेण्यात आले. 

त्यानुसार डिसेंबर २०२० दस्त नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर जानेवारीमध्ये त्यांना नोंदणीची कागदपत्रे देण्यात आली. परंतु त्यावर संशय आल्याने भावळे यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशी केली असता, त्यांना देण्यात आलेले दस्त बनावट असल्याचे उघड झाले. त्यांनी खरेदी खताची नोंद केली असतानाही एजंटने भाडे कराराची नोंद केली होती. त्याद्वारे शासनाला केवळ १५०० रुपये भरून उर्वरित १ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केला होता. शिवाय दस्तावर खोटे स्टॅम्प वापरून शासनाचीदेखील फसवणूक केली. त्यामुळे भावळे यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सखोल चौकशी केली असता इतर तिघांची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले.

राजकीय दबाव रियल इंटरप्रायजेस कार्यालयातील विठ्ठल रसाळ या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मात्र या घोटाळ्याची सूत्रधार महिला व सहकाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी घणसोली गावातील एका राजकीय व्यक्तींकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. या राजकीय व्यक्तीच्या शिफारशीवरून अनेकांनी त्या एजंटकडून दस्त नोंदवले आहेत. त्यापैकी बहुतेक जणांना बनावट दस्त देऊन फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातून शासनाच्या महसुलावर डल्ला मारणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी