शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

बनावट संकेतस्थळ रॅकेट उघड; सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 07:07 IST

Crime news: १०,५२१ जणांची १० कोटी रुपयांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बनावट संकेतस्थळांवरून जाहिरातीद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अशाच दोन संकेतस्थळांवरून एलपीजी गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली देशभरातील १०,५२१ जणांना १० कोटी १३ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहाजणांना सायबर पोलिसांनी अटक केल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी दिली. 

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर रोजी अशाच एका संकेतस्थळावरील जाहिरातीला भुलून एका तक्रारदाराने तीन लाख ६६ हजार रुपये गमावले. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा नोंद करत सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. सहस्त्रबुध्दे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रमोद खोपीकर, रवी नाळे, अमित उतेकर, गणेश शिर्के, राहुल खेत्रे, मधुबाला लावंड यांनी सुरू केलेल्या तपासात दोन बनावट संकेतस्थळ मिळून आले. यावरून देशभरातील नागरिकांना गॅस एजन्सी देण्याचे आमीष दाखवून बिहार आणि पश्चिम बंगालमधून फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार दोन पथके बिहार, एक पथक पश्चिम बंगाल, तर एक पथक रत्नागिरीला रवाना झाले.

तांत्रिक तपासाच्या आधारे बँक खातेधारक आणि लाभार्थी अशा तिघांना बिहारमधून अटक केली. याबाबत समजताच रत्नागिरीतील आरोपीने पळ काढला. त्याचा पाठलाग करत जसगडमधून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून वेबसाईट तयार करणाऱ्या दोन अभियंत्यांना पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून अटक केली. ही टोळी फेक वेबसाईट बनवून त्यावर विविध प्रकारच्या जाहिराती देतात. लोकांनी जाहिरातीवर क्लिक करताच हुबेहूब दिसणाऱ्या जाहिरातीमुळे लोक ठगांच्या जाळ्यात अडकायचे. नोंदणी केल्यानंतर आरोपी बनावट ईमेलद्वारे कागदपत्रे पाठवत असत. त्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी यात पैसे भरले. अशाप्रकारे आरोपींनी दोन वेबसाईटद्वारे देशातील १०,५२१ नागरिकांची फसवणूक केली आहे. बिहार पटनामधून ही टोळी कार्यरत होती.....

तुमचीही फसवणूक झाली आहे का?तुमचीही अशाप्रकारे फसवणूक झाली असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

१२३ फेक वेबसाइट आरोपींनी उर्वरित १२३ फेक वेबसाइटवरून कर्ज देण्याच्या बहाण्याने बजाज फिनसर्व्ह, बजाज इंस्टंट लोन, पेट्रोल पंप डीलरशिप, स्नॅपडील, नापतोल, रिलायन्स टॉवर यांच्या नावाखाली फसवणूक केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजी