शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात बनावट सॅनिटायजर विकणारे भामटे जेरबंद : ५२ बाटल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:18 IST

बनावट सॅनिटायजर तयार करून ते विविध मेडिकल स्टोर्समधून विकण्याचे प्रयत्न चालविणाऱ्या दोन भामट्यांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले.

ठळक मुद्देएमआयडीसी पोलिसांकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन आणि अवघा समाजच विविध उपापययोजना करीत असताना काही समाजकंटक मात्र आपले खिसे भरण्यासाठी कामी लागल्याचे धक्कादायक वास्तव नागपुरात उघड झाले आहे. बनावट सॅनिटायजर तयार करून ते विविध मेडिकल स्टोर्समधून विकण्याचे प्रयत्न चालविणाऱ्या दोन भामट्यांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. विक्की जयराम खानचंदानी (वय ४०) आणि जितेंद्र जयकिशन मुलानी (वय ४२) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही जरीपटक्यात राहतात.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता राज्य शासनाने विविध उपाययोजना जारी केल्या आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायजरची मागणी अचानक वाढली. ती लक्षात घेत गल्लाभरू वृत्तीच्या मंडळींनी त्याचा काळाबाजार करणे सुरू केले आहे.

जादा दरात ते विकले जात आहेत. एकीकडे हे चित्र असताना शुक्रवारी जरीपटक्यातील आरोपी विक्की खानचंदानी याने बनावट सॅनिटायजरच्या बाटल्या एमआयडीसीतील विविध मेडिकल स्टोर्सच्या संचालकांना विकण्याचे प्रयत्न केले. विविध मेडिकल स्टोर्समध्ये संपर्क साधून ५० आणि १५ मिलिलिटरच्या बाटल्या भरलेले सॅनिटायजर विकण्याचा प्रयत्न करत होता. एका जागरूक मेडिकल स्टोर्सच्या संचालकाला हे सॅनिटायजर बनावट (भेसळयुक्त) असल्याचे लक्षात आले. त्यांनी आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घालून शुक्रवारी सायंकाळी या भामट्याला गुंतवून ठेवले आणि त्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेच धाव घेत खानचंदानीला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सॅनिटायजरच्या १०० एमएलच्या ५० बाटल्या तसेच १५ एमएलच्या दोन बाटल्या जप्त करण्यात आल्या. या बाटल्या कुठून आणल्या, अशी विचारणा केली असता त्याने जितेंद्र मुलानीचे नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी मुलानीची शोधाशोध करून शनिवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले. एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे, द्वितीय निरीक्षक राजेश पुकळे, उपनिरीक्षक देवानंद बगमारे, नायक मंगेश गर्व, शिपाई अमोल ठाकरे आणि विक्की मेश्राम यांनी ही कामगिरी बजावली.

नागपुरात  बॉटलिंग !सूत्रांच्या माहितीनुसार, हे रॅकेट नेमके कोण आणि कुठून संचलित करीत आहे, ते अजून उघड झाले नाही. मात्र, बनावट सॅनिटायझरचा कच्चा माल मध्य प्रदेशातून नागपुरातून पाठविला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही या रॅकेटचे नेटवर्क असून, नागपुरात मोठ्या प्रमाणात बॉटलिंग करून ते बाजारात पाठविले जात असल्याचीही माहिती पुढे आली आहे. या रॅकेटने अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझर विकण्यासाठी ठेवल्याचीही माहिती आहे. पोलिसांच्या मर्यादा, तपासात अडचणविशेष म्हणजे, ज्या कलमानुसार खानचंदानी आणि मुलानीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात त्यांना अटक केली जाऊ शकत नसल्याचे पोलीस सांगतात. अटकच केली गेली नसल्याने त्यांच्याकडून पाहिजे त्या पद्धतीने गुन्ह्याची माहिती काढून घेण्यात पोलिसांना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालण्याची गरज आहे. तसे झाले तरच महामारी म्हणून घोषित झालेल्या आणि त्यामुळे आधीच भयभीत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या समाजकंटकांवर कायद्याचा चाबूक ओढला जाऊ शकतो. 

टॅग्स :corona virusकोरोनाArrestअटक