शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

बनावट फार्मसी कॉल सेंटरचा भांडाफोड, अमेरिकन नागरिकांना विकत होता व्हायग्रा

By पूनम अपराज | Updated: November 25, 2020 16:50 IST

Fake pharmacy call center busted : त्याच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या ११ जणांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देमालाड येथील लिंक रोडवर विशाल घनश्याम सोनी याने आपल्या कार्यालयात बोगस कॉल सेंटर थाटले होते. बोरिवलीतील चिकूवाडी येथे राहणाऱ्या सोनीने लॉकडाऊनचे नियम शिथिल करून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे फेक फार्मसी कॉल सेंटर थाटले. 

मुंबईतील मालाड येथील बनावट फार्मसी कॉल सेंटरला मुंबईपोलिसांनी भांडाफोड केला आहे. अमेरिकेत बंदी असलेली औषधे  देण्याचे आमिष देऊन अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका ३८ वर्षीय अकाऊंटटला मुंबई क्राईम ब्रांच युनिट ११च्या पोलिसांनीअटक केली आहे. विशाल घनश्याम सोनी असं या आरोपीचं नाव आहे. तसेच त्याच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या ११ जणांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात येणार आहे. 

मालाड येथील लिंक रोडवर विशाल घनश्याम सोनी याने आपल्या कार्यालयात बोगस कॉल सेंटर थाटले होते. बोरिवलीतील चिकूवाडी येथे राहणाऱ्या सोनीने लॉकडाऊनचे नियम शिथिल करून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे फेक फार्मसी कॉल सेंटर थाटले. याबद्दल गुप्त माहिती खबऱ्याकडून मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी विशाल सोनीच्या कार्यालयावर सोमवारी रात्री छापा टाकला. यावेळी कार्यालयामध्ये अनेक लोकं फेक कॉल करताना आढळून आले. पोलिसांनी विशाल सोनीला ताब्यात घेतले आहे.

फायनान्स अँड अकाउंटिंगमध्ये पदवीधर असलेल्या सोनीकडे रात्री ११ जण त्याच्याकडे अकाउंटन्सी फर्ममध्ये दिवसा काम करत होते. रात्रीच्या वेळी ते बनावट ओळख निर्माण करून कॉल सेंटरमध्ये त्याच्यासाठी काम करत असत. आरोपी सोनी हा त्याच्या टीमकडून अमेरिकन नागरिकांना फोन करून व्हायग्रा, सियालिस आणि लेवित्रा यासारख्या लैंगिक समस्याच्या गोळ्या देण्याचे खोटे आश्वासन देत होता. या औषधांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे.

सोनीची गॅंग अमेरिकन नागरिकांना आपण अमेरिकेतून बोलत आहोत, असं भासवत होते. अमेरिकन लोकांच्या शैलीत ते त्यांच्याशी संवाद साधत होते. त्यामुळे समोरील व्यक्तीचा विश्वास बसल्यानंतर ते ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सोनीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई मिररने दिली आहे.  

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिस