शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

जळगावात बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 21:25 IST

साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगाव : एमआयडीसीला लागून असलेल्या मन्यारखेडा शिवारात पार्टेशनच्या घरात सुरु असलेला बनावट दारु निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी दुपारी उद‌्वस्त केला. त्यात साडे तीन लाखाच्या दारुसह, स्पीरीट, मशिनरी व वाहने मिळून साडे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.गणेश भाऊराव कोळी (२४, रा.शिरपूर), सुखदेव पूनमचंद पवार (३०,रा.चिखली, ता.शहादा), गणेश हिरालाल सोनवणे (२८,रा.अयोध्या नगर), सियाराम हरीराम पावरा (१९,रा.शिव कॉलनी) व भाईदास शिवला पावरा (१८,रा.धरबापाडा,मोराडी, ता.शिरपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमआयडीसीला लागूनच मन्यारखेडा शिवारात पत्री व पार्टेशनच्या घरात आठवडाभरापासून दारु निर्मिती केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सी.एच.पाटील यांना मिळाली होती. त्यानुसारअधीक्षक सीमा झावरे,बुलडाण्याचे निरीक्षक दीपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील,आनंद पाटील, सागर पाटील, सहायक फौजदार डी.बी.पाटील, जवान अजय गावंडे, कुणाल सोनवणे, नितीन पाटील, मुकेश पाटील, अमोल पाटील, राहूल सोनवणे व नंदू नन्नवरे यांच्या पथकाने दुपारी साध्या वेशात जावून कारखान्याला घेराव घातला. त्यामुळे एकालाही पलायन करण्यास संधी मिळाली नाही. दारु निर्मिती करतानाच पाचही जणांना ताब्यात घेतले. मशीन, दारु, स्पीरीट, बाटल्या व इतर साहित्यासह चारचाकी आणि दुचाकी ताब्यात घेतली.