शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत कोरोनाची बनावट लस प्रमाणपत्रे; पालिकेच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 10:51 IST

एपीएमसी आवारात कोविड १९ च्या लसीचे बनावट सर्टिफिकेट विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे.

नवी मुंबई : एपीएमसी आवारात कोविड १९ च्या लसीचे बनावट सर्टिफिकेट विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. त्यांच्याकडून सात बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तीन हजार रुपयांना एका प्रमाणपत्राची विक्री केली जात होती. याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये ऑनलाइन सेवा केंद्रचालकासह पालिकेच्या दोन कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.एपीएमसी मसाला मार्केटमध्ये कोविड १९ चे दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र विकले जात असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे उपनिरीक्षक शरद आव्हाड यांनी पथक तयार केले होते. या पथकाने मंगळवारी रात्री मसाला मार्केट आवारात बनावट ग्राहकाद्वारे सापळा रचला होता. त्यामध्ये या टोळीचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी नितीन आनंदराव शिंदे, विराज वाक्षे व अमोल झेंडे यांना अटक करण्यात आली आहे. 

नितीन याचे एपीएमसीमध्ये ऑनलाइन सेवा केंद्र आहे, तर विराज व अमोल हे महापालिकेच्या एनएमएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत. त्यापैकी अमोल हा सध्या तुर्भेतील लसीकरण केंद्रावर डेटा इंट्रीचे काम करत होता. नितीनच्या ऑनलाइन सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्रे व स्मार्ट कार्ड आढळून आली आहेत. ही प्रमाणपत्रे कल्याण, डोंबिवली भागातील रहिवाशांची असल्याचे समजते. 

एपीएमसी आवारातील व्यक्तींना अशी प्रमाणपत्रे दिली जात होती. त्यासाठी नितीन याने त्याच मित्र विराजच्या मदतीने तुर्भे लसीकरण केंद्रात काम करणाऱ्या अमोलला संपर्क साधला होता. यावेळी पैशाच्या आमिषाला भुलून अमोलने पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आयडी वापरून,  शासनाच्या संकेतस्थळावर बनावट नोंदी केल्या होत्या. मात्र पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात बनावट ग्राहकालादेखील त्यांनी अशाप्रकारे प्रमाणपत्र दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. 

एक प्रमाणपत्र तीन हजारांनारेल्वे, बस यामधून प्रवासासाठी मॉल, नाट्यगृह यात प्रवेश मिळविण्यासाठी तसेच कामाच्या ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासले जाते. त्याद्वारे अशाच ठिकाणी वापरासाठी त्यांनी अनेकांना बनावट लस प्रमाणपत्र विकल्याची शक्यता आहे. एका प्रमाणपत्राची तीन हजार रुपयांना  विक्री केली जात होती. याप्रकरणी एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNavi Mumbaiनवी मुंबई