शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

एआयद्वारे तयार होताहेत बनावट आधार, पॅनकार्ड; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:06 IST

वैयक्तिक स्तरावर यामुळे ओळख चोरी होऊन सायबर गुन्हेगार बँक खात्यामधून अनधिकृत व्यवहार करू शकतात आणि आर्थिक फसवणूक करू शकतात. 

मुंबई : आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) साधनांचा वापर करत बनावट आधार, पॅनकार्ड तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. सायबर विभागाने याबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याचा वापर आर्थिक फसवणुकीसह देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यापर्यंत केला जाऊ शकतो, अशी शक्यताही आहे. त्यामुळे असे बनावट आधार, पॅनकार्डबाबत माहिती मिळताच तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.

सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी बनावट शासकीय ओळखपत्रे तयार करण्याचे प्रकार वाढत आहेत. काही वापरकर्त्यांनी तर ‘साम ऑल्टमन’ आणि ‘एलोन मस्क’ यांसारख्या उच्च पदस्थ व्यक्तींच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून हे सिद्धही केले आहे. अशा कृती पुढे गंभीर स्वरूप घेऊ शकतात. वैयक्तिक स्तरावर यामुळे ओळख चोरी होऊन सायबर गुन्हेगार बँक खात्यामधून अनधिकृत व्यवहार करू शकतात आणि आर्थिक फसवणूक करू शकतात. 

बनावट ओळखपत्र कसे ओळखायचे?सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बनावट आधार किंवा पॅन कार्डमध्ये न जुळणारे फॉन्ट आढळतात. हिंदी, इंग्रजी मजकुराच्या लेखन रचना भिन्न आढळते. ओळखपत्रातील व्यक्तीचे छायाचित्र कृत्रिम भासते. खऱ्या ओळखपत्रात क्यूआर कोड असतो. बनावट ओळखपत्रांवर तो आढळत नाही. शुद्धलेखनाच्या चुकांवरून ओळखपत्र बनावट आहे हे ओळखता येऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा प्रकारचे ओळखपत्र आढळल्यास सायबर विभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

गैरवापराची भीतीबनावट ओळखपत्राचा वापर बँका, टेलिकॉम कंपन्या आणि सरकारी योजना फसवण्यासाठी होऊ शकतो. यामुळे बोगस कर्जे, अवैध खाते निर्मिती आणि सार्वजनिक निधीचा अपहार होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने, अशा नकली दस्तऐवजांचा गैरवापर कायद्याची अंमलबजावणी टाळण्यासाठी, सायबर गुन्हे घडवण्यासाठी आणि संभाव्य गैरकृत्यांसाठी होऊ शकतो. 

 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सcyber crimeसायबर क्राइम