शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी गेली माहेरी, पतीनं संधी साधली; प्रेयसीला मुक्कामासाठी बोलावलं घरी, पण अचानक....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:50 IST

पत्नीकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; पतीनं धरला वेगळाच हट्ट

दिल्ली: लग्नानंतर काही जण आपल्या जोडीदारासोबत निष्ठेनं राहत नाहीत. विश्वासघाताच्या घटना घडत राहतात. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांची संख्या वाढली आहे. नोएडामध्ये नुकताच असा एक प्रकार घडला. पतीला रंगेहात पकडणाऱ्या पत्नीनं पोलीस ठाणं गाठलं. 

ग्रेटर नोएडामध्ये वास्तव्यास असलेल्या एकाची पत्नी माहेरी गेली. त्यानं ही संधी साधून प्रेयसीला घरी बोलावलं. विशेष म्हणजे त्याची प्रेयसीदेखील विवाहित होती. पत्नी माहेराहून येईपर्यंत त्यानं प्रेयसीला घरातच ठेवलं. मात्र पत्नी अचानक दाखल झाली आणि पतीचं भांडं फुटलं. पत्नीनं दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. त्यानंतर ती प्रचंड संतापली. पत्नीचे कुटुंबीय तिथे दाखल झाले. त्यांना गोंधळ घातला.

प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पत्नीनं पतीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पतीनं आता आपल्याला प्रेयसीसोबतच राहायचं असल्याचं सांगितलं. ग्रेटर नोएडाच्या दनकौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या भागात वास्तव्यास असलेल्या दोन भावांचं लग्न मथुरेत राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींशी झालं. मात्र वाद झाल्यानं दोघीजणी माहेरी निघून गेल्या. 

पत्नी माहेरी गेल्याचं पाहून पतीनं त्याच्या प्रेयसीला घरी बोलावलं. याची माहिती एका व्यक्तीकडून मेहुण्याला समजली. त्यानं ही गोष्ट बहिणीला सांगितली. त्यामुळे पती अचानक घरी आली आणि पतीला रंगेहात पकडलं. पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी याबद्दल संताप व्यक्त केला. सध्या पोलीस दोन्ही बाजू ऐकून घेऊन तपास करत आहेत.