शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठार मारण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी उकळली; दोघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: November 16, 2022 18:49 IST

शैक्षणिक संस्था चालकाला दिली धमकी: ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: शाळेत केलेल्या अनधिकृत बांधकामाची महापालिकेत तक्रार करण्यासह ठार मारण्यची देत भिवंडीतील शैक्षणिक संस्था चालकाकडून एक लाखांची खंडणी उकळणाºया दिलीप साठे उर्फ दिलीप पाटील (२९) आणि विकास  कांबळे (२३) या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक  केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी बुधवारी दिली. त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

भिवंडीतील बॉम्बे केब्रींज स्कूलचे संचालक राकेश शेट्टी यांनी शाळेतील पाण्याच्या टाकी बांधकामाचे नूतनीकरण अलिकडेच केले होते. हे बांधकाम बेकायदेशीर असून त्याची महापालिकेत तक्रार करण्याची  दिलीप पाटील याने शेटटी यांना धमकी दिली. त्याबाबत शेटटी यांनी त्यांचे सचिव प्रदीप पाटील यांना दिलीप याला भेटून त्याच्याशी त्याबाबत चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार प्रदीप हे दिलीपला भेटले. यावेळी,  दिलीपने प्रदीप पाटील यांना ''तुम्ही केलेले बांधकाम अनाधिकृत असून  जर तुम्हाला हे बांधकाम नियमित करायचे असेल तर तुम्ही मला दोन लाख रुपये द्या, नाहीतर मी महानगर पालिकेमार्फत तुम्हाला नोटीस काढेल,  अशी धमकी देत नोटीस थांबविण्यासाठी प्रदीप  यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली. दरम्यान ‘पोलीसांना माहिती दिली तर तुमच्या जिवाचे बरे वाईट होईल’ असेही धमकावले.

याबाबत पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांच्या माहितीनुसार प्रदीप यांनी दिलीप याच्याशी तडजोडीची चर्चा केली. त्यावेळी पालिकेला तक्रार न करण्यासाठी अखेर एक लाख रुपये देण्याचे ठरले. तेच पैसे ठाणे रेल्वे स्थानक  परिसरातील एका हॉटेलमध्ये स्वीकारताना या दोघांनाही ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे, सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, उपनिरीक्षक विजय राठोड, उपनिरीक्षक महेश कवळे आणि जमादार सुभाष तावडे आदींच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध  ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करुन त्यांना १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अटक केली. पाटील हा भिवंडी कामतघर तर कांबळे हा शेलारगांवातील रहिवासी आहे. दोघेही  मुळचे उस्मानाबाद येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. नाळे हे करीत आहेत.