शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

अवैध बेटिंग ॲपचा पर्दाफाश; १२३ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 10:29 AM

मुंबईसह देशात १० ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाचे छापे 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना अवैधरीत्या बेटिंग व ऑनलाइन गेम्सची सुविधा देत असल्याचे सांगत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळत गंडा घालणाऱ्या मे. एनआययूएम कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत कंपनीची १२३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे; तसेच याप्रकरणी मुंबई, चेन्नई व कोची येथे १० ठिकाणी छापेमारी केली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, या कंपनीने ऑनलाइन गेम व बेटिंगसाठी ॲप तयार केले होते. याचा देशभरात प्रसार केला. या ॲपच्या वॉलेटमध्ये पैसे भरून खेळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; तसेच अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने सुरुवातीला घसघशीत बक्षिसेही दिली; मात्र हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये प्राप्त झाल्यानंतर कंपनीचे ॲप इंटरनेटवरून गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी सर्वप्रथम केरळ व हरियाणा येथून पोलिसांत तक्रार दाखल झाली होती; मात्र या घोटाळ्याची व्याप्ती देशव्यापी असल्यामुळे व याप्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘ईडी’ने हा तपास सुरू केला आहे.

या घोटाळ्याद्वारे मिळालेले पैसे सिंगापूर येथे सुरू केलेल्या काही बनावट कंपन्यांकडे पाठविण्यात आले; तसेच भारतात देखील काही बनावट कंपन्यांची स्थापना करण्यात आली होती. सिंगापूर येथील कंपन्या सॉफ्टवेअर खरेदी करीत असल्याचे दाखवत त्या खरेदीपोटी हे पैसे पुन्हा भारतात पाठवत असल्याचे तपासात आढळून आले.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी