शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर कंपनीची बदनामी प्रकरणी माजी एसीपीच्या मुलावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 05:34 IST

या भेटीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याचे त्याने सांगितले. सिद्धेश हा महिला व तिच्या भावाच्या संपर्कात असल्याने अधून-मधून त्यांच्या कार्यालयात यायचा.

मुंबई : खासगी लायसनिंग कंपनीचे फेसबुक लॉगिन करून बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या माजी एसीपी सुनील घोसाळकर यांचा मुलगा सिद्धेश (३१) याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.तक्रारदार महिला व त्यांच्या भावाने खासगी लायसनिंग सर्व्हिस देणारी कंपनी सुरू केली. कुठल्याही प्रकारच्या इव्हेंटसाठी आवश्यक असणारे सर्व परवाने योग्य त्या  डिपार्टमेंटमधून काढून देण्याचे काम या कंपनीतून सुरू होते. कंपनीची जाहिरात करण्यासाठी त्यांनी फेसबुकवर अकाउंट सुरू केले. २०२० मध्ये एसीपी घोसाळकर यांनी बीबीए झालेला त्यांचा मुलगा सिद्धेश याला काम शिकवण्याची विनंती त्यांच्याकडे केली. 

त्यांनी होकार देताच सिद्धेश कंपनी मालक असलेल्या महिलेला भेटला. या भेटीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याचे त्याने सांगितले. सिद्धेश हा महिला व तिच्या भावाच्या संपर्कात असल्याने अधून-मधून त्यांच्या कार्यालयात यायचा. इतकेच नव्हे तर त्यांचा संगणकदेखील तो हाताळायचा. दरम्यानच्या काळात व्यवसाय सुरू करायचे सांगून सिद्धेशने त्यांच्याकडे पैसे मागितली. एसीपी घोसाळकर यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांनी त्याला पैसे दिले. मात्र, तो वेगवेगळी कारण देत वारंवार पैशांची मागणी करू लागल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचाच राग मनात ठेवून सिद्धेशने कंपनीचे फेसबुक अकाउंट हॅक करत बदनामीकारक पोस्ट केली. या प्रकरणी सायबर क्राइमकडे तक्रार केली. सिद्धेश हादेखील कंपनीच्या फेसबुक अकाउंटचा ॲडमिन असल्याचा दावाही तक्रारदारांनी केला आहे. 

क्लायंटनाही धमकावलेकंपनीशी जुडलेल्या क्लायंटना काम थांबवण्याचा इशारा सिद्धेशने दिला. काम बंद न केल्यास तुमचीही बदनामी करू, असे सिद्धेशने धमकावले, असा आरोप महिलेने तक्रारीत केला असल्याचे बीकेसी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सिद्धेश याने क्रिकेटर विराट कोहलीच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट बनवून त्यावरून कंपनीची बदनामी केली. ज्याचे स्क्रीन शॉट्स तक्रारदाराने पोलिसांना दिले असून त्याबाबत तांत्रिक तपास सुरू आहे.