शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

दर तीन दिवसांनी एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:26 IST

पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़

ठळक मुद्देसत्र काही थांबेना : कर्जमाफीसह शासनाच्या इतर योजनाही ठरताहेत ‘बोलाचाच भात बोलाचीच कढी’

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़शाश्वत सिंचनाची कुठलीही सोय नसलेल्या नांदेड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात़ त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त बनते. केवळ निसर्गाच्या भरवशावर शेतक-यांची सर्व मदार आहे़ परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी दुष्टचक्रात अडकला आहे़शेतकºयाला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली़ परंतु त्यानंतरही आत्महत्येचा फेरा सुरुच आहे़ कर्जमाफीसाठीच्या किचकट नियमात शेतकरी अडकले़गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात ६४५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या़ तर नवीन वर्षात जानेवारीमध्ये ६, फेब्रुवारीत ११ व मार्चमध्ये ३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे़ त्यात यंदा कपाशीला बोंडअळीचा मोठा फटका बसला़ नगदी पीक असलेल्या कापसाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले़ त्यानंतर लगेचच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांना तडाखा दिला़ त्याचबरोबर शेकडो हेक्टरवरील फळबागांचेही अतोनात नुकसान झाले़ जवळपास २२ हजार हेक्टरवरील पिकांचे त्यामुळे नुकसान झाले़ त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे काही ठिकाणी पिकांना त्याचाही फटका बसला़ अशा लागोपाठ अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़‘आप’चे उपोषण१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह पवनार जवळील दत्तपूर येथे जावून सामूहिक आत्महत्या केली होती़ ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते़ सोमवारी या घटनेला ३२ वर्षे होत आहेत़ त्यामुळे आम आदमी पक्षाच्या वतीने सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आप’चे बालाजी आबादार यांनी दिली़