शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हॅण्डग्लोव्हज् घालून लाच घेतली तरी सरकारी कर्मचारी अडकणार एसीबीच्या सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:05 IST

हॅण्डग्लोव्हज् ठरणार पुरावा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची करडी नजर

जितेंद्र कालेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सध्या सरकारी कार्यालयांमध्ये पाच ते दहा टक्के कर्मचारी संख्या आहे. पगार आणि नोकर कपातीच्या काळात लोकांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने हातात ग्लोव्हज् घालून लाचेची रक्कम स्वीकारली तरी तो एक भक्कम पुरावा होऊ शकतो. त्याद्वारेच त्याला पकडता येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आणि रुग्णालय वगळता बहुतांश शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी संख्या आता अत्यल्प केलेली आहे. ती टप्प्याटप्प्याने वाढविली जाणार आहे. त्याचवेळी अनेक खासगी कंपन्यांमधून पगार आणि कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबिले जात आहे. शासकीय कर्मचारी संख्या जशी वाढविली जाईल तशी विविध कामांसाठी या कार्यालयांमध्ये गर्दीही होणार आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांकडून लोकांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात दोन लाचेच्या सापळ्यांची नोंद एसीबीकडे आहे. असे असले तरी यापुढे ग्लोव्हज् घालूनही लाचेचे पैसे स्वीकारले जाण्याची शक्यता आहे.

मुळात, एखादी तक्रार आल्यानंतर सापळा लावण्यापूर्वी एसीबीकडून जे पैसे दिले जातात त्या नोटांना अ‍ॅन्थ्रॉसिन पावडर लावली जाते. नोटांची पावडर हाताला लागली की त्यावर अल्ट्राव्हायलेट रेज मारल्यानंतर ती पावडर निळ्या रंगाची दिसते. हाच मोठा पुरावा एसीबीकडे येतो. त्यामुळे आरोपीचे रेकॉर्डिंग आणि पंच याबरोबरच हा पुरावाही ग्राह्य धरला जातो. यापुढे एखाद्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॅण्डग्लोव्हज् घालून पैसे घेतले तरी हे हॅण्डग्लोव्हज् पुरावा म्हणून ताब्यात घेतले जाणार आहेत. त्या वेळी हा पुरावा महत्त्वाचा ठरणार आहे. सापळ्याच्या वेळी हा पुरावा नष्ट करण्याच्या हालचाली झाल्या तरी त्यावर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती या अधिकाºयाने दिली.ठाणे ग्रामीणमधील शहापूरचे उपअधीक्षक दिलीप सावंत यांनी विनयभंगातील एका आरोपीला मदत करण्यासाठी तब्बल ५0 लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अलीकडेच गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली. अलिबागमध्ये एका कृषी केंद्राच्या नूतनीकरणासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी कृषी अधिकाºयाला अटक केली.