शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार कोटींचे इफेड्रीन प्रकरण: ममताची गोठविलेली बँक खाती खुली करण्यास न्यायालयाचा विरोध, ठाण्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 11:39 IST

Ephedrine case worth Rs 2,000 crore: तब्बल दोन हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात सहआरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपली गोठवलेली बँक खाती पुन्हा खुली करण्यास ठाणे विशेष न्यायालयाकडे मागणी केली होती.

- जितेंद्र कालेकरठाणे : तब्बल दोन हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात सहआरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपली गोठवलेली बँक खाती पुन्हा खुली करण्यास ठाणे विशेष न्यायालयाकडे मागणी केली होती. तिचा हा अर्ज ठाणे न्यायालयाने सोमवारी फेटाळला असून बँक खाती आणि तिच्या सदनिका खुल्या करण्यासही विरोध दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे विशेष सत्र न्यायालयात अभिनेत्री ममता हिच्या वकिलांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, २०१६ मध्ये चुकीने तिचे इफेड्रीन प्रकरणात नाव गोवले गेले आहे. तिच्या कुटुंबात ती एकमेव कमवती आहे. तिच्या एका बहिणीवर नवी मुंबईतील पनवेल येथील एका केंद्रावर गेल्या आठ वर्षांपासून उपचार सुरू आहेत. तिची सर्व बँक खाती आणि ठेवी या न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी गोठविल्या आहेत. बँक खाती गोठवल्यामुळे बहिणीच्या वैद्यकीय उपचारांसाठी औषधे तसेच इतर खर्च करणेही आपल्याला शक्य होत नाही. याच बहिणीला चांगल्या स्वच्छ निरोगी वातावरणात ठेवण्यासाठी मुंबईच्या अंधेरीतील दोन सदनिकाही खुल्या केल्या जाव्यात, अशी मागणी तिने ठाणे न्यायालयात एक महिन्यापूर्वी दिलेल्या अर्जात केली आहे. हाच अर्ज २ ऑगस्ट २०२१ रोजी ठाणे न्यायालयाने फेटाळून या गुन्ह्यांची तीव्रता मोठी असल्याने बँक खाती आणि तिच्या अंधेरीतील दोन्ही सदनिका पुन्हा खुल्या करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ममताला सध्या तरी आपली बँक खाती कायदेशीररीत्या खुली होण्याची आणखी वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

काय होते प्रकरण? कथित ड्रगमाफिया विकी गोस्वामीला कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रीनची देशविदेशात तस्करी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप अभिनेत्री ममता हिच्यावर आहे. त्यामुळेच तिची भारतातील सर्व बँक खाती जुलै २०१६ मध्ये गोठविली आहेत. त्यावेळी तिच्या बँक खात्यात ८० ते ९० लाखांची रक्कम जमा होती. विकीसह ममता, अशा चौघांविरुद्ध रेड कॉर्नरची नोटीसही बजावली होती. विकी गोस्वामी आणि एव्हॉनचा संचालक मनोज जैन यांच्याबरोबर ८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत ममता सामील झाल्याचे पोलिसांना पुरावे मिळाले होते. त्यानंतरच तिच्या बँक खात्यांची चौकशी पोलिसांनी केली.  यात एका खात्यातून विकीची बहीण रिटाच्या खात्यामध्ये दोन कोटी रुपये वळते झाले आहेत. त्यावरूनच रिटाचीही पोलिसांनी चौकशी केली होती. तिनेही आपल्यावरील आरोपांचा इन्कार करीत केवळ चांगली मैत्रीण असल्यामुळेच व्यवसायासाठी आपल्याला ममताने हे पैसे दिल्याचा दावा केला होता. 

असा आहे ममताच्या बँक खात्यांचा तपशीलपोलिसांच्या दाव्यानुसार ममताची मडापो (भूज, गुजरात), कालवाड रोड (राजकोट, गुजरात), बदलापूर (ठाणे, महाराष्ट्र) येथील अ‍ॅक्सिस बँकांच्या शाखांमध्ये २६ लाखांची रोकड आहे. मालाड मुंबईच्या शाखेत एक लाख अमेरिकन डॉलर्स (६७ लाख रुपये भारतीय चलन) अशी सुमारे ९३ लाखांची रक्कम २०१६ मध्ये होती. हीच खाती सील असल्यामुळे ममता किंवा तिच्या नातेवाइकांना तिथून पैशांचे व्यवहार करता येत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Courtन्यायालय