शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Emotional News: मोखाड्यात भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले; एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 07:56 IST

घटनेचा निषेध नोंदविताना स्थानिकांनी रास्ता रोको केला. दरम्यान, वाहने शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा/जव्हार : तालुक्यातील नाशिक-जव्हार महामार्गावर असलेल्या मोरचुंडी येथे शनिवारी दुपारी एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. यात दोन बालके चिरडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, चालकाने घाईघाईने ट्रक पुन्हा मागे घेतला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला, तर तेथील एका दुकानालासुद्धा धडक दिली. यात दुकानाचे पत्रे तुटले असून, मोठे नुकसान झाले आहे.

जव्हार-नाशिक मुख्य रस्त्यावर मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये-जा करीत असतात. दुपारी ३.१७ मिनिटांनी जव्हारहून नाशिकच्या दिशेने ट्रक जात होता. चालक नशेत होता. त्याने वाहन हयगयीने चालवीत विरुद्ध दिशेने, तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. यात आरोही नकुल सोनार (वय ५), पायल भालचंद्र वारघडे (वय ९) या दोन मुली जागीच ठार झाल्या, तर एकाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोखाडा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिकांनी केला रास्ता रोको nघटनेचा निषेध नोंदविताना स्थानिकांनी रास्ता रोको केला. दरम्यान, वाहने शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली. nतर ट्रकने झाडाला धडक दिल्याने ट्रकने पेट घेतल्याने ट्रकचेही मोठे नुकसान झाले.