शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाचा उल्लेख नाही; एल्गार परिषद प्रकरणी आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 08:42 IST

एल्गार परिषद प्रकरणाचा प्राथमिक तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी आपल्या प्रस्तावित मसुदा आरोपपत्रात म्हटले आहे की, या शस्त्रांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याशी संबंध आहे. मात्र, एनआयएने त्यांच्या मसुदा आरोपपत्रात पंतप्रधानांच्या हत्येचा उल्लेख केलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २०१८ च्या एल्गार परिषद - माओवादी संबंध प्रकरणातील १५ आरोपींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी केला होता. त्यावरून देशात खळबळ माजली होती. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयात सादर केलेल्या मसुदा आरोपपत्रात आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करण्यासाठी शस्त्रास्त्रे जमविल्याचे म्हटले आहे. त्यात त्यांनी थेट पंतप्रधानांचा उल्लेख केलेला नाही.

एल्गार परिषद प्रकरणाचा प्राथमिक तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी आपल्या प्रस्तावित मसुदा आरोपपत्रात म्हटले आहे की, या शस्त्रांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याशी संबंध आहे. मात्र, एनआयएने त्यांच्या मसुदा आरोपपत्रात पंतप्रधानांच्या हत्येचा उल्लेख केलेला नाही. या १५ आरोपींविरोधात एनआयएने विशेष न्यायालयात मसुदा आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपींनी दहशतवादी कारवायांसाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ तर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टिस) च्या विद्यार्थ्यांची भरती केल्याचा दावा एनआयएने यात केला आहे.

आरोपींवर यूएपीए व भारतीय दंडसंहितेअंतर्गत १६ वेगवेगळे आरोप लावण्यात आले आहेत. त्यामध्ये देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे.संबंधित १५ आरोपी हे बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेशी संबंधित आहेत. राज्यभरातील दलित आणि इतर वर्गाच्या सांप्रदायिक भावनांचे शोषण करण्यासाठी आणि राज्यात व पुणे जिल्ह्यात हिंसाचार, अस्थिरता, अराजकता निर्माण करण्यासाठी जातीच्या नावावर भडकविण्यासाठी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली. अत्याधुनिक शस्त्र एम-४ च्या वार्षिक पुरवठ्यासाठी आठ कोटी रुपयांची मागणी किंवा आयोजन करण्यासाठी कट रचला. तसेच दहशतवादी कारवाया अमलात आणण्यासाठी विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची भरती केली, असेही  एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चा