शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

एल्गार परिषद: आरोपींच्या कुटुंबीयांना वैद्यकीय अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 2:18 AM

भारद्वाज यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. भायखळा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी, आरोपी असल्याने भारद्वाज यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज, डॉ. आनंद तेलतुंबडे व वेर्नोन गोन्साल्विस यांचे वैद्यकीय अहवाल त्यांचे कुटुंबीय, वकील आणि एनआयएला द्यावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

भारद्वाज यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. भायखळा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी, आरोपी असल्याने भारद्वाज यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यांना मधुमेह असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आहे, असे भरद्वाज यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

त्यावर सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी भारद्वाज यांचे २१ आॅगस्ट रोजी सादर केलेले वैद्यकीय अहवाल न्यायालयाला दाखवत म्हटले की, भारद्वाज यांची प्रकृती चांगली असून त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास त्यांना ते उपलब्ध करून देण्यात येतील.भारद्वाज यांच्या प्रकृतीची माहिती घेणे, हा त्यांच्या कुटुंबीयांचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले. तर, डॉ. तेलतुंबडे व गोन्साल्विस यांच्या याचिकेवरील स्वतंत्र सुनावणीत ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले की, तेलतुंबडे यांचा कोरोना चाचणीचा सुधारित अहवाल शुक्रवारी सादर करू. न्यायालयाने या दोघांचेही वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबाला देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाHigh Courtउच्च न्यायालय