शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चहा न दिल्याच्या रागातून केली वृद्ध आईची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 04:26 IST

धारावीतील घटना, सावत्र मुलगा अटकेत

मुंबई : सकाळी चहा न दिल्याच्या रागात सावत्र मुलाने ६५ वर्षीय आईचा गळा दाबून तिला भिंतीवर ढकलले. यात डोक्याला जबर मार बसल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना धारावीत रविवारी घडली. धारावी पोलिसांनी सावत्र मुलगा हनुमंता देवराज (३८) याला अटक केली.धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीच्या राजीव गांधी नगर येथील झोपडपट्टीत सुशीलाम्मा बालप्पा पोतराज (६५) या एकट्याच राहत होत्या. हनुमंता सुशीलाम्मा यांच्या जेवणाबरोबर औषधोपचारही बघायचा. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत गोवंडीत राहतो.सुशीलाम्मा यांना भेटण्यासाठी तो अधूनमधून घरी येत असे. रविवारी तो सकाळीच घरी आला आणि त्याने चहा बनवून देण्यास सांगितले. त्या झोपेत असल्याने लवकर उठल्या नाहीत. याच रागात त्याने त्यांचा गळा दाबला. त्या ओरडू लागल्याने त्यांचे तोंड दाबले. रागाने त्यांना भिंतीवर ढकलले. यात डोक्याला जबर मार बसल्याने त्या बेशुद्ध पडल्या. हे पाहून त्याने घटनास्थळावरून पळ काढत गोवंडीतील घर गाठले. स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे गेले. त्या वेळी हनुमंताही नातेवाइकांसह आला. सुशीलाम्मा यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

मारेकऱ्याचा शोधात तोही सहभागीअनोळखी व्यक्तीने तिची हत्या केली असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी हनुमंताही नातेवाइकांच्या गर्दीत सहभागी झाला होता. धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तपासात हनुमंताच तिच्या घरी येत-जात असे, अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्याची उलटतपासणी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार सोमवारी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.