शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वयोवृद्ध सासूला सूनेची जबर मारहाण, कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Updated: October 10, 2023 23:13 IST

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एरव्ही, सासूने सूनेला मारहाण केल्याच्या किंवा सूनेचा छळ केल्याच्या घटना नेहमीच पोलिस ठाण्यात येत असतात. परंतू, कोपरीमध्ये ७७ वर्षीय ज्योती दयारामानी या सासूलाच ५३ वर्षीय कोमल दयारामानी या सुनेने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी मंगळवारी दिली. या प्रकाराची व्हिडिओ क्लिपही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कोपरीतील नाखवा हायस्कूलजवळील सिद्धार्थ नगरातील साई तिर्थ या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. आपल्या तक्रारीमध्ये सासू ज्योती दयारामानी यांनी म्हटले आहे की, १४ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्या घरातील हॉलमधील सोफ्यावर बसलेल्या होत्या. त्यावेळी त्या अशक्त असल्याचे माहिती असूनही त्यांची सून कोमल यांनी त्यांना बेदरकारपणे पकडून हाताने तोंडावर जोराने फटके मारुन खाली खेचून ओढून फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या पाठीला, कमरेला दुखापत झाली. त्यानंतर ३ ऑक्टाेबर रोजी ज्योती या घरातील कॉमन वॉशरुम वापरण्यास गेल्या असता, कोमल यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांच्या हाताला पकडून जोरदार खेचून खाली पाडले. त्यांनी सासूला शिवीगाळ करुन पोटात आणि पाठीवर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गळा दाबून घरातून जाण्याची धमकीही दिली. या मारहाणीतही त्यांना चांगलाच मार लागला आहे.

याप्रकरणी कोमल यांनी कोपरी पोलिस ठाण्यात ९ ऑक्टाेंबर रोजी रात्री मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे वागळे विभागाचे सहायक पोलिस आयुक्त गजानन काब्दुले यांनी सांगितले. यातील आरोपी काेमल यांना नोटीस बजावली जाणार असून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल-

दरम्यान, यातील सूनेने सासूला मारहाण करीत असल्याचा तसेच घरातून बाहेर जाण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी मोठया प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे या घटनेविषयी ठाणे शहरातून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणे