शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध पित्याला घराबाहेर काढले, मुलासह महिलेविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 15:46 IST

याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी आरोपी गणेश तुळशीराम गादे (रा. मायानगर) व एका महिलेविरूद्ध ज्येष्ठ नागरिक कायद्यातील कलम २४ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. 

अमरावती : वृद्ध पित्याला घराबाहेर काढण्यात आले. त्यापूर्वी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० च्या सुमारास मायानगर येथील अडवाणी लेआऊट येथे ही घटना घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी आरोपी गणेश तुळशीराम गादे (रा. मायानगर) व एका महिलेविरूद्ध ज्येष्ठ नागरिक कायद्यातील कलम २४ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. 

तक्रारीनुसार, तुळशीराम गादे हे ७५ वर्षीय वृद्ध असून, ते मुलगा गणेश याच्याकडे अडवाणी लेआऊटमध्ये राहतात. मात्र, १७ नोव्हेंबर रोजी गणेश व एका महिलेने संगणमत करून त्यांच्याशी वाद घातला. तथा त्यांना जेवायला दिले नाही. तर, एका महिलेने तुळशीराम गादे यांना काठीने डोक्यावर मारहाण केली. शिविगाळ करून घराबाहेर काढून दिले. 

संपूर्ण रात्र थंडीत कुडकुडत काढत गादे यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. आपल्याला सांभाळायची जबाबदारी मुलाची असताना तो सांभाळत नाही, जेवायला देखील देत नाही. इतकेच काय तर, त्यांना उपचाराकरिता पैसे देखील देत नसल्याची तक्रार त्यांनी नोंदविली. दरम्यान, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक आरती गवई करीत आहेत.

काय आहे ज्येष्ठ नागरिक कायदा?वृद्धांना आर्थिक सुरक्षा, वैद्यकीय सुरक्षा, देखरेख (राहण्याचा खर्च) आणि संरक्षण देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कायदा, २००७ लागू करण्यात आला आहे. त्यातील कलम २४ नुसार, ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषणाची जबाबदारी असलेली मुले, पालक अशा व्यक्तिंनी ज्येष्ठ नागरिकांना, कायम स्वरूपी अथवा तात्पुरते सोडून देण्याच्या उद्देशाने कृती केली असल्यास या कायद्या अंतर्गत असे करणाऱ्या व्यक्तीस तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास / अथवा पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोनही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी