शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू काशिलिंग आडकेसह आठजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 21:54 IST

कासेगावमध्ये दारूअड्डा, जुगार : दीड लाखाचा माल जप्त

कासेगाव (जि. सांगली) : कासेगाव (ता. वाळवा) येथील घरामध्ये तीनपानी पत्त्यांचा जुगार व दारूअड्डा चालविल्याप्रकरणी सोमवारी रात्री आंतरराष्ट्री कबड्डीपटू काशिलिंग रामचंद्र आडके (वय २७) याच्यासह आठजणांना कासेगाव पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यावेळी एक लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कासेगाव येथील घरामध्ये पत्त्यांचा जुगार व दारूअड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री काशिलिंग आडकेच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तेथे तीनपानी पत्त्यांचा जुगार सुरू होता. पोलीस दिसताच काहीजण पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांना पकडण्यात आले. यावेळी काशिलिंग आडके, पांडुरंग बबन पाटसुते (२८), आरिफ नबीलाल मुल्ला (३२), अतुल पांडुरंग परीट (४०), रसिक इसाक नायकवडी (२३), हर्षद विलास पाटील (२४, सर्व रा. कासेगाव), जोतिराम शिवाजी पाटील (२७, रा. कापूसखेड) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटारसायकली, विदेशी दारू असा एकूण एक लाख ६१ हजार २८० रुपयांचा माल जप्त केला. 

काशिलिंग  व्यसनाच्या आहारीकाशिलिंग आडके याला प्रो-कबड्डी लीगच्या दुसºया सत्रात ‘बेस्ट रायडर’चा बहुमान मिळाला होता. परंतु, गतवर्षी प्रो-लीग कबड्डीमध्ये त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. त्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. पेट्रोलियम कंपनीतील त्याची नोकरीही सुटली होती. त्यामुळे त्याला दारूचे व जुगाराचे व्यसन लागल्याची चर्चा आहे. स्वत:च्या घरात तो जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

कडक निर्बंधामध्येही जुगारअड्डाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असून, जमावबंदीच्या कडक निर्बंधामध्येही कासेगाव येथे जुगारअड्डा सुरू होता. कबड्डीपटूकडून असे कृत्य घडल्याबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 

टॅग्स :Policeपोलिस