शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेच्या तपासात ईडीची एन्ट्री?; ‘समरथ’ कंपनी ब्लॅकलिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 08:42 IST

राज्यात सहा ठिकाणी घेतली कामे, समरथ कंपनीने काम मिळविण्यासाठी ‘वर्क डन’अंतर्गत मनपाला पुण्यात एक मल्टी स्टोरेज इमारत बांधल्याचे प्रमाणपत्र सादर केले.

औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने ‘समरथ’ कंपनीवर गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे काम मनपाकडून सुरू आहे. या महाघोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे राज्य शासनामार्फत ताब्यात घेतल्याची माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

‘समरथ’ कंपनीने पंतप्रधान आवास योजनेत राज्यात गंगापूर, फुलंब्री, सोयगाव (औरंगाबाद), माजलगाव (बीड), देवगड (सिंधुदुर्ग), राहता (अहमदनगर) येथील कामे घेतली आहेत. काम मिळविण्यासाठी पुण्यातील एक इमारत बांधल्याचा दावा कंपनीने केला. खरोखर कंपनीने इमारत बांधली का? याची शहानिशा मनपा करणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेशी संबंधित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेत एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार समरथ कंपनीने एकाच आयपीवरून तीन निविदा आल्याचे समोर आले. चौथी एलोरा कन्स्ट्रक्शन अपात्र ठरविण्यात आली. या प्रकरणात कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी गुन्हा दाखल झाला. 

प्रकल्प सल्लागार समितीही त्यांचीच योजनेचा सविस्तर डीपीआर तयार करण्यासाठी प्रकल्प सल्लागार समितीसुद्धा संबंधित कंपनीचीच होती. अहवाल तयार करताना अक्षम्य चुका करण्यात आल्या. जागा ताब्यात नसताना, जागा बघितलेली नसताना डीपीआर तयार केला. ३९ हजार घरे त्या जागांवर बांधणे शक्यच नाही.

म्हणे पुण्यात बांधली उंच इमारत समरथ कंपनीने काम मिळविण्यासाठी ‘वर्क डन’अंतर्गत मनपाला पुण्यात एक मल्टी स्टोरेज इमारत बांधल्याचे प्रमाणपत्र सादर केले. मुळात कंपनीने ही इमारत बांधली का? हे तपासण्यासाठी मनपाने समिती स्थापन केली असून लवकरच समिती पुण्यात जाऊन पाहणी करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.  

एकाच आयपी ॲड्रेसवरून भरल्या निविदा महापालिकेतील पंतप्रधान आवास योजनेच्या विभागप्रमुख उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समरथ कन्स्ट्रक्शन ॲण्ड जे. व्ही., इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जॅग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या तीन कंपन्यांनी १०३.२११.६१.१८४ या एकाच आयपी ॲड्रेसवरून कंत्राटासाठी निविदा भरल्या. तीन कंपन्यांनी संगनमत केल्यामुळे समरथ कंपनीला कंत्राट मिळाले.

४६ कोटींपैकी भरले फक्त ८८ लाख  औरंगाबाद शहरात ३९ हजार घरे बांधायची होती. कंपनीने दाखल केलेल्या दरानुसार प्रकल्पाची किंमत ४ हजार ६०० कोटी रुपये होते. प्रकल्पाच्या किमतीच्या तुलनेत १ टक्का बॅँक गॅरंटीप्रमाणे ४६ कोटी भरणे अपेक्षित होते. त्यांनी फक्त ८८ लाख रुपये भरले. त्यामुळे मनपाने ‘समरथ’ कंपनीसोबत ॲग्रीमेंट केले नाही.