शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इक्बाल मिर्चीच्या जागेत इडीचे कार्यालय; बॅलार्ड पिअर येथून वरळीला होणार स्थलांतरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 07:15 IST

मिर्चीने खरेदी केलेल्या वरळी येथील सीजे हाऊस येथे ईडीचे कार्यालय स्थलांतरित होत आहे.

मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक ड्रग्ज इक्बाल मिर्ची याच्या जप्त केलेल्या वरळीतील मोक्याच्या जागेत सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) नवीन कार्यालय होणार आहे. त्यामुळे एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागेत आता ईडीचे कार्यालय उभे राहणार असल्याने अनेक दिग्गज नेत्यांची चौकशी करणारे ईडी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मिर्ची याचा २०१३ रोजी लंडनमध्ये मृत्यू झाला. त्याआधी त्याने अवैध धंदे, खंडण्या, ड्रग्ज तस्करीतून मिळवलेल्या पैशातून वरळीसह ताडदेव, क्रॉफर्ड मार्केटसह मुंबईत, तसेच विदेशातही मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. ईडीने प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) कायद्यांतर्गत आदेश जारी करत इक्बालच्या ६०० कोटीच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.

मिर्चीने खरेदी केलेल्या वरळी येथील सीजे हाऊस येथे ईडीचे कार्यालय स्थलांतरित होत आहे. सध्या ईडीचे कार्यालय दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथे आहे. इक्बाल मिर्चीच्या या संपत्तीची एकूण किंमत शंभर कोटींहून अधिक होती. ईडीने १४ हजार स्क्वेअर फूट पसरलेल्या दोन या मजल्यांचा ताबा घेतला होता. ही मालमत्ता तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आहे. ईडीचे अधिकारी या नवीन कार्यालयात आवश्यक ते बदल करत आहेत.

विकासकाकड़ून १४ हजार चौ. फूटांचे फ्लॅट्स

मिर्चीने ही मालमत्ता मिलेनियम डेव्हलपर्सला विकली. बिल्डरने मिर्ची फॅमिलीला तिसऱ्या मजल्यावर ९ हजार चौ. फूट आणि चौथ्या मजल्यावर ५ हजार चौ. फुटांचे फ्लॅट्स दिले होते.

हॉटेल ते ड्रग्ज तस्करीचा अड्डा...

सीजे हाऊसच्या आधी येथे वरळीचे प्रसिद्ध गुरुकृपा हॉटेल होते. हे हॉटेल सी साईड इन आणि ललित रेस्टॉरंट म्हणूनही ओळखले जात असे. हे हॉटेल एम. के. मोहम्मदच्या नावाने होते. त्यांचा शेजारील जमीन मालकाशी वाद सुरू होता. १९८६ मध्ये इक्बाल मिर्ची याने ही मालमत्ता मोहम्मदकडून दोन लाख रुपयांना विकत घेऊन पहिली पत्नी हाजरा हिच्या नावावर केली होती. नंतर मिर्चीने गॅरेज आणि मालमत्तेला लागून असलेली इमारत अतिक्रमण करून तेथे पब सुरू केला. मात्र, नंतर त्याला हा पब बंद करावा लागला. तेथून तो ड्रग्जचा काळा धंदा करत होता.