शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

गोव्यात हॉटेल व्यावसायिकाला ईडीची नोटीस; ३१ ऑगस्टला कार्यालयात हजर राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 02:08 IST

ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या हॉटेलच्या दारावर ही नोटीस चिकटविली आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया हिला रद्द केलेल्या व्हॉटस्अ‍ॅप संदेशाबद्दल अधिकाºयांनी विचारणा करून काही संदेश प्राप्त केल्याची माहिती मिळते.

पणजी : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मनी लॉण्ड्रिंगच्या दिशेने तपास करणाऱ्या सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याला 31 रोजी चौकशीकरिता उपस्थित राहण्यासाठी नोटिस बजावली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या हॉटेलच्या दारावर ही नोटीस चिकटविली आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया हिला रद्द केलेल्या व्हॉटस्अ‍ॅप संदेशाबद्दल अधिकाºयांनी विचारणा करून काही संदेश प्राप्त केल्याची माहिती मिळते. अमली पदार्थ व्यवहारप्रकरणी हे संदेश असल्याचा कयास आहे. हणजुण येथील गौरव आर्या याच्या मालकीच्या ‘हॉटेल टॅमेरिंड’ला ईडीच्या अधिकाºयांनी भेट दिली असता ते बंद आढळले. त्यामुळे हॉटेलच्या दरवाजावर नोटिस चिकटविण्यात आली. आर्या याला ३१ रोजी मुंबईत सकाळी ११ वाजता ईडीचे सहायक संचालक राजीव कुमार यांच्यासमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजावले आहे. आर्या याच्या मालकीचे ‘कॅफे कोटिंगा’ हे अन्य एक आस्थापनही गोव्यात आहे. मात्र हॉटेल आणि हे आस्थापन लॉकडाऊनपासून बंदच आहेत.

गोव्यात रिसॉर्ट असलेला हॉटेल उद्योजक गौरव आर्या या प्रकरणात एनसीबीच्याही रडारखाली आहे. अलीकडेच वागातोर येथे झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थाच्या पुरवठ्याचे गूढही याच प्रकरणाशी जोडले जात आहे. दिल्लीहून या तपासकामाची सूत्रे हलविली जात आहेत. संशयित रिया चक्रवर्ती व गौरव आर्या यांच्यातील कथित व्हॉटस्अ‍ॅप संभाषण हाती लागल्याचा दावा तपास एजन्सीने केला आहे.मुंबई पोलिसांवर राजकीय दडपण : आठवलेनवी दिल्ली : मुंबई पोलीस राज्य सरकारच्या दबावात काम करीत असल्याने अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांचे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी सर्वप्रथम मी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे दिल्यानंतर मी सुशांतसिंह यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळणार असल्याचा विश्वास दिला, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दिली.‘लोकमत’शी बोलताना आठवले म्हणाले, मुंबई पोलीस कोणत्याही प्रकरणाचा छडा केवळ २४ तासांमध्ये लावत असते; परंतु सुशांतसिंहप्रकरणी दोन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही काहीच प्रगती दिसत नव्हती.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत