शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिलांच्या डोक्याला ताप, कोरोना काळात ७० मुली सैराट; ५६ जणी परतल्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:33 IST

सर्वाधिक मुली पळून गेल्याची धक्कादायक बाब आली समोर

अलिबाग : जिल्ह्यात मागील वर्षीपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने थैमान घातला आहे. असे असतानाही ७० मुली सैराट झाल्या आहेत. यात विशेष म्हणजे, महिलांचाही समावेश आहे. यातील केवळ ५६ मुली घरी परतल्या असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

देशासह राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. दुसरीकडे मात्र याच काळात सर्वाधिक मुली पळून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील तीन वर्षांचा विचार केला असता, जिल्ह्यातून कोरोना काळात मुली पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

गतवर्षात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ७० गुन्हे दाखल आहेत. १८ वर्षांखालील मुलगी पळून गेली असेल, हरवलेली असेल, तर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. १८ वर्षांच्या पुढील मुली अथवा महिलेच्या गुन्ह्यात मिसिंग दाखल करण्यात येते. बहुतांश प्रकरणांत मुली किंवा महिला या त्यांच्या मर्जीने प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने किंवा सोबत राहण्यासाठी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

अनेक प्रकरणांत सहमतीने पळून गेल्यामुळे या प्रकरणात १८ वर्षे पूर्ण नसले, तर त्या मुला-मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात येते. दरम्यान, अनेक जण अल्पवयीन असताना फरार झाले असतील, तर १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यातही हजर झालेले आहेत. पोलीस प्रशासनाकडून सातत्याने त्यांचा शोध घेतला जातो. त्यामुळे वर्षाअखेर जेवढे गुन्हे दाखल झालेले असतात. त्यापैकी बहुतांश गुन्हे निकाली निघतात. पोलीस विभागाकडून मुलींचा शोध घेतल्या जात आहे.

१४ मुलेही बेपत्ताजिल्ह्यातून तब्बल १४ मुले पळून गेले होते. त्यापैकी १४ मुले मिळून आले आहेत, युद्ध पातळीवर पोलिसांनी या मुलांचा शोध घेतल्याने ते मिळून आले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एका मुलीचा शोध लागेनारायगड जिल्ह्यात मागील वर्षात ५७ मुली पळून गेल्या आहेत. त्यातील ५६ मुली मिळून आल्या आहेत. अद्यापही एका मुलींचा शोध लागला नाही.

मागील काही दिवसांपासून महाविद्यालयातील मुले-मुली पळून जात आहेत. हा चिंतेचा विषय आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पालकांनीही तेवढेच सतर्क राहून पाल्यावर लक्ष दिले पाहिजे. आम्ही पळून गेलेल्या मुलींचा शोध घेत आहोत.  - अशोक दुधे, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Policeपोलिस