शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रॉयली प्लॉटस्थित कॅफेआड 'दम मारो दम', क्राईम वनची हुक्का पार्लरवर धाड

By प्रदीप भाकरे | Updated: September 1, 2024 14:41 IST

गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे अधिकारी व अंमलदार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रॉयली प्लॉटस्थित साक्षी कॅफे ॲंड रेस्टॉरंट येथे हुक्का पार्लरमार्फत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन सुरू असल्याची माहिती मिळाली.

अमरावती : रॉयली प्लॉटस्थित साक्षी कॅफे ॲंड रेस्टारंटमध्ये कॅफेआड चालणाऱ्या हुक्का पार्लरवर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने धाड घातली. शनिवारी रात्री तेथून हुक्क्याचा ‘दम’ मारणाऱ्या चार तरूणांसह संचालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरूद्ध सिटी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.             गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे अधिकारी व अंमलदार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रॉयली प्लॉटस्थित साक्षी कॅफे ॲंड रेस्टॉरंट येथे हुक्का पार्लरमार्फत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन सुरू असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे, तेथील दुसऱ्या माळ्यावर धाड घातली असता साक्षी कॅफे ॲंड रेस्टॉरंटचामालक प्रणव प्रमेंद्र शर्मा (२६, रा. राॅयली प्लॉट) हा धुम्रपान व सेवनाकरिता तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व सेवन करण्यास सहाय्य करतांना विनापरवाना मिळून आला. तसेच तेथे मोहीत सुनिलकुमार फलवाणी (२१, रा. कृष्णा नगर), प्रथमेश मनोजराव मसांगे (१८, रा. गाडगेनगर), पियुष सुनिल बसंतवाणी (२१, रा. कृष्णा नगर) हे हुक्का पिताना आढळून आले. 

आरोपी प्रणव शर्मा याच्याकडून २१०० रुपये किमतीचा हुक्का पॉट, पानरस फ्लेवरचे छोटे पॅकेट, फ्लेवरचे डबे व सहा मॅजिक कोल पॅकेट असा ३२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखा युनिट एकचे प्रमुख तथा वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरिक्षक मनीष वाकोडे यांच्या टिमने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी रात्रीदेखील राजहिलनगर येथील एका फ्लॅटमध्ये चालणाऱ्या हुक्का पार्लरचा तेथील स्थानिक लोकांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी तेथून हुक्कासाहित्य जप्त केले होते.

शहरातील शाळा, कॉलेज व इतर ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच अमंली पदार्थ बाळगणारे, विकणारे तसेच सेवन करणाऱ्यांविरूदध धडक मोहिम राबविली जात आहे. युवावर्गाला नशामुक्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असून, त्याबाबत शाळा, कॉलेज व इतर गर्दीच्या ठिकाणी बैठकी व कार्यशाळा घेण्यात येत आहेत.- नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी