शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक; सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतींमध्ये करायचे चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 17:50 IST

चार गुन्हे उघड

नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई व परिसरात चाळीस हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील ३ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. 

घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कसून प्रयत्न सुरु आहेत. त्याकरिता गुन्हे घडणाऱ्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले जात आहेत. यादरम्यान १०० हुन अधिक ठिकाणच्या सीसी टीव्हीच्या तपासणीत वाशी पोलिसांच्या हाती माहिती लागली होती. दोन व्यक्ती कार मधून परिसरात रेकी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या वेळी सापळा रचला होता. त्याकरिता वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक सचिन ढगे, उपनिरीक्षक शशिकांत लोंढे, हवालदार शैलेंद्र कदम, संजय भाले, श्रीकांत सावंत आदींचे पथक तयार करण्यात आले होते. यावेळी शुक्रवारी रात्री दोघेजण संशयास्पद वावरताना आढळून आले. अधिक चौकशीत ते चोर असल्याचे समोर येताच त्यांना अटक करण्यात आली आहे.

संजय कांबळे (४२) व सद्दाम खान (३८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून वाशी पोलिसठाने हद्दीतले तीन व दादरचा एक गुन्हा उघड झाल्याचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यामधील ३ लाख ७७ हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या दोघांवर मुंबई परिसरात ४० हुन अधिक गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून इतरही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्यांना १० डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस