शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नोकरी गेली, आर्थिक चणचण; बायको काम करीत असलेल्या घरात केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 18:54 IST

Robbery Case :हितेश शांतीलाल छेडा उर्फ जैन (वय 36) असे अटक आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरू होता.

डोंबिवली - येथील पुर्वेकडील लोढा हेरीटेज मधील नवनीत नगर कॉम्प्लेक्समध्ये राहणा-या हितेन गोगरी यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना 20 एप्रिलला घडली होती. वडीलांना कोरोना झाल्याने घरात सॅनिटायझर फवारणी करण्यासाठी आलेल्या दोघा जणांवर चोरीचा संशय घेतला गेला होता. परंतू कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या तपासात सात महिन्यांनी का होईना या गुन्हयाची उकल झाली असून घरकाम करणा-या महिलेच्या नव-यानेच या दागिन्यांची चोरी केल्याचे उघड  झाले. त्याच्याकडून 4 लाख 80 हजाराचे 11 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

हितेश शांतीलाल छेडा उर्फ जैन (वय 36) असे अटक आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरू होता. त्यांच्याकडून संशयितांसह रंगकाम आणि घरकाम करणा-यांसह अनेकांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान संशयावरून घरकाम करणा-या महिलेसह तीचा नवरा हितेश याचीही चौकशी केली गेली होती. दरम्यान त्याने दिलेला जबाब आणि त्याच्या मोबाईल ट्रेसींग आणि कॉलच्या मिळालेल्या माहीतीत पोलिसांना विसंगती आढळुन आली. त्यामुळे त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली गेली. तपासाअंती त्याच्यावरील संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गोगरी यांच्या घरातील 11 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. हितेशने संबंधित दागिने काही जणांना विकले होते परंतू पोलिसांना चोरलेले 4 लाख 80 हजाराचे सर्व दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. वरीष्ठ पोलिस निरिक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक भुषण दायमा, पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, नवनाथ कवडे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, सचिन साळवी, अनुप कामत, महेश साबळे, पोलिस शिपाई गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी, महिला पोलिस हवालदार ज्योत्स्ना कुंभारे आदिंच्या पथकाने ही कामगिरी केली.

...त्यामुळे चोरी करण्याची वेळ आलीआपण मुंबईत एका ठिकाणी काम करत होतो परंतू कोरोनामुळे नोकरी गेली. नोकरी गेल्यावर हाताला मिळेल ती कामे करायचो परंतू तुटपुंज्या मिळणा-या कमाईपुढे उदरनिर्वाह चालविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे चोरी करण्याची वेळ आल्याची माहीती हितेशने चौकशीत दिल्याची माहीती या गुन्हयाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर यांनी दिली.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरीArrestअटक