शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात किनाऱ्यावर २ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; इराणी जहाजात लादलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 06:39 IST

पाेरबंदरजवळ सर्वात माेठी सागरी कारवाई; इराणी जहाजातून ३,३०० किलो वजनाचे अमली पदार्थ घेतले ताब्यात; तस्करीचे जाळे उद्ध्वस्त

पोरबंदर/नवी दिल्ली : गुजरातलगत अरबी समुद्रात भारतीय सुरक्षा यंत्रणा व अमली पदार्थ विरोधी यंत्रणांनी एका इराणी जहाजातून ३३०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले असून याप्रकरणी पाच विदेशी नागिरकांना अटक केली. समुद्रात केलेल्या कारवाईत प्रथमच इतका मोठा साठा जप्त करण्यात आला.

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे २ हजार कोटी रुपये आहे. गेल्या सात दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे़.  पुणे आणि दिल्लीत झालेल्या कारवायांसह सुमारे ७,५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, नौदल, अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी), गुजरात पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईला ऐतिहासिक स्वरूपाचे यश मिळाले आहे. देशाला अमली पदार्थांपासून मुक्त करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून त्यानुसार ही पावले उचलण्यात आली आहेत. 

अटक केलेले इराण किंवा पाकिस्तानचे नागरिक?nएनसीबीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय टोळीकडून समुद्रमार्गे तस्करी करण्यात आलेला आजवरचा सर्वांत मोठा अमली पदार्थांचा साठा पकडण्यात आला.n याप्रकरणी अटक केलेले पाच जण इराण किंवा पाकिस्तानचे नागरिक असावेत असा संशय आहे. nते कोणत्या देशाचे नागरिक आहेत हे स्पष्ट करणारी कोणतीही कागदपत्रे या आरोपींकडे सापडली नाहीत.

इराणी जहाजावर होते तस्करआंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर (आयबीएमएल) अरबी समुद्रात वेरावल बंदरापासून २ किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. पाचही तस्कर इराणी जहाजावर होते. जप्त केलेल्या ३३०० किलो अमली पदार्थांमध्ये ३०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ