शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत रंगला थरार! ड्रग्ज तस्कराने एनसीबी अधिकाऱ्याला नेले २०० मीटर फरफटत; फिल्मी स्टाईलने एकजण जाळयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 19:17 IST

यात एका तस्कराला अटक करण्यास एनसीबीला यश आले असून, अन्य पसार साथीदारांचा शोध सुरु आहे.                

ठळक मुद्देया दरम्यान तस्कराने अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत अधिकारी जखमी झाला मात्र त्याने तस्कराला बेडया ठोकल्या. त्याच्याकड़ून ६२ ग्रँम एमडी जप्त करण्यात आला आहे. 

मुंबई : एनसीबीची ड्रग्ज तस्करावर धड़क कारवाई सुरु असताना अंधेरी येथे एका कारवाईत ड्रग्ज तस्कर आणि ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचा पाठलाग करताना दोन अधिकारी जखमी झाले. यात एका ड्रग्ज तस्कराने अधिकाऱ्याला २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची एखाद्या हिंदी चित्रपटातील थरारक दृश्याप्रमाणे रंगणारी घटना गुरूवारी घडली. यात एका तस्कराला अटक करण्यास एनसीबीला यश आले असून, अन्य पसार साथीदारांचा शोध सुरु आहे. एहसान खान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 

एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेड़े यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी अंधेरीच्या वीरा देसाई इंडस्ट्रियल इस्टेट रोड परिसरात ३ तस्कर येणार असल्याची माहिती मिळताच, पथकाने सापळा रचला. तस्कर ड्रग्ज देण्यासाठी दुचाकीवरून तेथे धड़कताच पथकाने त्यांच्याकड़े धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून त्यांनी दुचाकीवरून पळ काढ़ला. जवळपास अडीच किलो मीटर अंतरापर्यन्त पाठलाग करूनही दोन तस्कर पळण्यास यशस्वी झाले. तर दुसरीकडे एका अधिकाऱ्याने अन्य एका तस्करावर झड़प घातली.

 

एनसीबीच्या अधिकाऱ्याने त्याला पकडताच त्याने २०० मीटर अंतरापर्यंत त्या अधिकाऱ्याला फरफटत नेत पळ काढ़ला. यात, तो अधिकारी जखमी झाला आहे. तर आणखीन एका तस्कराने दुचाकीवरून उड़ी घेत, रहिवासी इमारतीच्या दिशेने पळ काढ़ला. अधिकाऱ्याने त्याचा पाठलाग करत त्याला पकड़ले. या दरम्यान तस्कराने अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत अधिकारी जखमी झाला मात्र त्याने तस्कराला बेडया ठोकल्या. त्याच्याकड़ून ६२ ग्रँम एमडी जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोArrestअटकDrugsअमली पदार्थMumbaiमुंबई