शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमधून नागपूरला जायचे ड्रग्ज पार्सल; ड्रग्ज तस्करीचे विदर्भ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2022 09:17 IST

पत्नी, मुलांच्या उदरनिर्वाहासह झटपट श्रीमंत होण्यासाठी तो ड्रग्ज तस्करीच्या साखळीत उतरला. टक्केवारीवर एमडी घेऊन विदर्भातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत होता.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केशकर्तनकार मोहम्मद शाहरुख शफी शेख (२८) याला ड्रग्ज तस्करीप्रकरणी घाटकोपरच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यानंतर, त्याच्या चौकशीतून विदर्भातील ड्रग्ज  कनेक्शन उजेडात आले आहे. तो कुरिअरद्वारे नागपूरसह विविध ठिकाणी एमडी ड्रग पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्याला ड्रग्ज पुरविणाऱ्या डोंगरीतील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

घाटकोपर पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वात पथकाने वरळी येथून मोहम्मदला गुरुवारी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तब्बल १ कोटी ९९ लाख किमतीचे ९९५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. त्याने, डोंगरीतील दोन आरोपींकडून हे एमडी घेतल्याची माहिती पथकाला दिली आहे. त्यानुसार, पथक यामागील आरोपींचा शोध घेत आहे.       

शेख याला दोन पत्नी आहेत. पत्नी, मुलांच्या उदरनिर्वाहासह झटपट श्रीमंत होण्यासाठी तो ड्रग्ज तस्करीच्या साखळीत उतरला. टक्केवारीवर एमडी घेऊन विदर्भातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत होता. गेल्या दोन वर्षांपासून कुरिअरद्वारे त्याचे ड्रग्ज पार्सल नागपूरसह विविध ठिकाणी रवाना होत होते. जप्त करण्यात आलेले ड्रग्जही नागपूरला पाठविण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच गुन्हे शाखेने कारवाई करत त्याला ब्रेक लावला. त्याने, आतापर्यंत कुणाला किती ड्रग्ज दिले? यामागे आणखी किती जणांचा सहभाग आहे? याबाबत पथक कसून चौकशी करत आहे. 

 ‘तो’ ड्रग्जचा  कारखानाही उद्ध्वस्त     एएनसीच्या घाटकोपर पथकाने गेल्या महिन्यात मुंबईत गांजा तस्करी करणाऱ्या मुंबईसह पेण, रत्नागिरीमधील आरोपींची धरपकड केली. यामध्ये कारवाईची कुणकुण लागताच प्रशांतने माल खाडीत फेकून देण्यास सांगितला. पथकाने ३ फूट चिखलात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला.     मात्र, काही हाती लागले नाही. अखेर ज्या आरोपीला गांजा फेकून देण्याची जबाबदारी दिली त्याने त्यातील अर्धा किलो माल बाजूला काढून तो विकण्याचा प्रयत्न केला आणि यातच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहितीही समोर आली. सध्या गुन्हे शाखेने त्यांची अलिबागमधील ड्रग्ज फॅक्टरीही उद्ध्वस्त केली आहे.