शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

नशेबाज आईने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीवर ओतले गरम पाणी, १ तास तडफडून झाला मृत्यू 

By पूनम अपराज | Updated: December 18, 2020 15:27 IST

Murder : 26 वर्षीय कैटी क्राउडरने आपली निष्पाप मुलगी ग्रेसी क्राउडरच्या अंगावर गरम पाणी ओतले होते आणि नंतर ती स्वत: साफसफाईच्या कामाला लागली. 

ठळक मुद्देया महिलेस किंग्ज मिल हॉस्पिटलमधून अटक करण्यात आली. मात्र, क्रॉडरने मुलीच्या हत्येचा आरोप फेटाळून लावला. अटक आईने सांगितले की, त्यावेळी ती आपल्या कुत्र्यासाठी साफसफाई करीत होती.

लंडनमधील एका निर्दयी आईने आपल्या 19 महिन्यांच्या मुलीवर गरम पाणी ओतले. तासाभर रडत असताना आणि मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणात, निर्दय आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

26 वर्षीय कैटी क्राउडरने आपली निष्पाप मुलगी ग्रेसी क्राउडरच्या अंगावर गरम पाणी ओतले होते आणि नंतर ती स्वत: साफसफाईच्या कामाला लागली. महिलेवर गुन्ह्याच्या खटल्याच्या वेळी सरकारी वकील म्हणाले की, मुलीचा नैसर्गिक मृत्यू नव्हते. मुलाला मरेपर्यंत तब्बल एक तास त्याच तडफडणाऱ्या स्थितीत सोडले होते. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश जेरेमी बेकर यांनी ही घटना अत्यंत खेदजनक व धक्कादायक असल्याचे सांगितले.  न्यायाधीश पुढे म्हणाले की, मुलीला खूप वेदना झाल्या असाव्यात. ग्रॅसीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गरम पाणी ओतले, त्यावेळी ती त्याच गरम पाण्यात बसली होती. यामुळे, बाळाची त्वचा 65 टक्क्यांपर्यंत भाजली गेली, असे न्यायधीश म्हणाले.चिमुकलीचा तात्कळ मृत्यू झाला  नाही - न्यायाधीशन्यायाधीश पुढे म्हणाले की, वैद्यकीय अहवालात असे स्पष्ट झाले आहे की, मुलगी तातडीने मरण पावली नाही, मुलीने एक तासाने वेदना सहन केल्या त्यानंतर तिचा मृत्यू झाला. न्यायाधीश म्हणाले की, दुखापतीमुळे बाळाच्या रक्तवाहिन्यांमधील द्रव बाहेर पडला, ज्यामुळे मुलीच्या अवयवांनी कार्य करणे थांबवले आणि अखेर तिचा मृत्यू झाला.न्यायाधीश पुढे म्हणाले की, कोणतेही कारण असले तरी तुम्ही ताबडतोब ग्रॅसीला डॉक्टरकडे घेऊन जायला हवे होते. त्यामुळे तिचा जीव वाचला असता तर तुम्ही जळवळच  राहणाऱ्या  आपल्या आई -वडिलांची मदत घेतली नाही आणि तुम्ही तुमच्या मुलीला असेच तडफडत सोडले.

ती महिला मानसिक आजारी होतीन्यायाधीशांनी सांगितले की, मानसशास्त्र अहवाल लक्षात घेऊन क्रॉडर मानसिक तणावग्रस्त आणि मानसिकरित्या ग्रस्त होती असा निष्कर्ष काढला. ग्रॅसीच्या मृत्यूच्या वेळी क्रोडरने बऱ्यापैकी कोकेन सेवन केले  होते, परंतु या गोष्टीचा अद्याप खुलासा झालेला नाही की, गरम पाणी ओतण्यापूर्वीच क्रोडरने ड्रग्ज सेवन केले होते का?.या महिलेस किंग्ज मिल हॉस्पिटलमधून अटक करण्यात आली. मात्र, क्रॉडरने मुलीच्या हत्येचा आरोप फेटाळून लावला. अटक आईने सांगितले की, त्यावेळी ती आपल्या कुत्र्यासाठी साफसफाई करीत होती.

टॅग्स :MurderखूनLondonलंडनCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक