शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

वाहन चालकांनो सावधान! थर्टी फर्स्टसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला

By पूनम अपराज | Updated: December 31, 2020 19:24 IST

Traffic Police : मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलीस विभागाने देखील थर्टीफर्स्टच्या आदल्या रात्रीपासून दणक्यात कारवाई सुरु केली आहे. 

ठळक मुद्दे काळबादेवी येथे २, मुलुंड येथे १ तर माहीम परिसरात १ ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई - यंदा थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट असून मुंबई पोलिसांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात नाईट कर्फ्यू असून नववर्षाच्या स्वागतासाठी काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलीस विभागाने देखील थर्टीफर्स्टच्या आदल्या रात्रीपासून दणक्यात कारवाई सुरु केली आहे. 

३० डिसेंबर ते ३१ डिसेंबरच्या दुपारी २ वाजेपर्यंत मुंबईत २०९० वाहनांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मुंबई शहरात एकूण ९१ नाकाबंदीची ठिकाणे आहेत. ३० डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ते ३१ डिसेंबरच्या दुपारी २ वाजेपर्यंत ऐकून ६ हजार ८० वाहने तपासण्यात आली तर एकूण २ हजार ९० वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर एकूण ४ ड्रंक अँड ड्राईव्हअन्वये कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत सर्वाधिक वाहनांवर कारवाई विक्रोळी येथे करण्यात आली. विक्रोळी येथे १४६, चेंबूर येथे १२८, कांदिवलीत १११ आणि माटुंगा परिसरात १०२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन तसेच अन्य प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिथ ऍनालायझरचा वापर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेसाठी वापरत नसून कालपासून आज दुपारपर्यंत ४ दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काळबादेवी येथे २, मुलुंड येथे १ तर माहीम परिसरात १ ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी तैनात वाहतूक पोलिसाला वाहन चालक मद्यपान केल्याचा संशय आल्यास त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेऊन त्याची अल्कोहोल चाचणी करण्यात येते आणि त्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याचं वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, ब्रिथ ऍनालायझरचा वापर नसल्याने कारवाईची संख्या घटण्याची शक्यता नसल्याचं पडवळ यांनी पुढे सांगितले. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबईDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह