शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दोन लहानग्यांची गळे कापून निर्घृण हत्या; शेतात मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 17:43 IST

मृतांची ओळख न पटल्यानं पोलीस तपासात अडथळे; परिसरात भीतीचं वातावरण

बहराईच: उत्तर प्रदेशातल्या बहराईचमध्ये शेतात दोन चिमुरड्यांचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे. दोन्ही चिमुरड्यांची गळे कापून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. मृतांमध्ये एका मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे.

बहराईचमधल्या फखरपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ ला जोडणाऱ्या गजाधरपूर-बसंता रस्त्याच्या शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात दोन मृतदेह आढळून आले. याबद्दलची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. फखरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. तू मला का मारलंस, आता मी हिला मारणार! निर्दयी सुनेनं सासूच्या कानशिलात लगावल्या

पोलीस अधीक्षक सुजाता सिंह यांनीदेखील घटनास्थळाचा आढावा घेतला. आरोपींना अटक करण्यासाठी त्यांनी दोन पथकं तयार केली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश सिंह यांनी दिले आहेत. मात्र मृतदेहांची ओळख न पटल्यानं पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मृतांमध्ये १० वर्षांच्या मुलीचा आणि ८ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. दोघांना दुसऱ्या ठिकाणाहून आणून रात्री त्यांची हत्या करण्यात आली असावी अशा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली. लवकरच हत्येचं गूढ उकलण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.