शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमुळे मारेकरी जेरबंद, प्रेयसीच्या हत्येचं गुढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 05:33 IST

अनैतिक संबंधांतून प्रेयसीच्या पतीच्या हत्येचे गूढ उकलले, तिघे अटकेत

भिवंडी : तालुक्यातील कांबे परिसरात रस्त्यालगतच्या पुलाखाली मृतदेह गोणीत बांधून फेकलेल्या हत्येचा डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवरून शोध लावून तिघांना निजामपुरा पोलिसांनी अटक केली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी मंगळवारी दिली.२० जानेवारी रोजी कांबे पॉवर हाउस जुनादुरखी रस्त्यावरील रूपाला ब्रिजखाली रक्ताने माखलेल्या एका गोणीमध्ये मृतदेह आढळला होता. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला या मयताची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी पोलीस पथके बनवत तपास सुरू केला होता. तपासात मृतदेहाच्या शर्टाच्या खिशात अर्धवट फाटलेला डॉक्टर प्रिस्क्रिप्शनचा कागद सापडल्यानंतर या आधारावरून तपासाची दिशा ठरवून मेडिकल दुकानदार यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन कोणत्या भागातील डॉक्टरची आहे याचा शोध घेत असतानाच पोलिसांना एक महिला आपल्या पतीचा शोध घेत असल्याचे समजले. तिला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली असता, तो मृतदेह अरमान शेर अली शाह (वय ४५ ) याचा असल्याचे स्पष्ट झाले. 

यानंतर त्याची हत्या कोणी केली, याबाबत शोध घेत असताना हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीचे ती काम करत असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या मोहम्मद सलमान अब्दुल मुकीद शेख याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. यावरून मयत व्यक्तीने ते काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन मालकास याबाबत सांगून सलमान यास जाब विचारला होता. त्याचा राग मनात ठेवून त्याने सहकारी तस्लिमा हलीम अन्सारी व चांदबाबू ऊर्फ बिलाल सईद अन्सारी यांच्या मदतीने अरमान शेर अली शाह यास फसवून नेऊन त्यावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली.

या घटनेत कोणताही पुरावा नसताना प्रिस्क्रिप्शन वरून मृतदेहाची ओळख पटवत आरोपींना अवघ्या ४८ तासांत अटक केली. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरPoliceपोलिसbhiwandiभिवंडी