शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 08:01 IST

ही महिला मागील १ वर्षापासून सासर सोडून माहेरी राहत होती. महिलेने पती आणि तिच्या सासरच्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती.

कासगंज - उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका डॉक्टर पत्नीला तिच्या २ प्रियकरांसोबत हॉटेलच्या रुममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. या घटनेनंतर डॉक्टर पती आणि त्याच्या नातेवाईकांनी पत्नी आणि तिच्या दोन्ही प्रियकराला बेदम मारलं. या हायव्हॉल्टेज ड्रामा व्हिडिओत कैद करण्यात आला त्यानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी पत्नी आणि तिच्या २ प्रियकरांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षापासून पती-पत्नी यांच्यात वाद होता. दोघेही वेगवेगळे राहायचे. डॉक्टर पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात काम करत होते. मागील काही दिवसांपासून पती पत्नीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. बुधवारी महिलेला २ युवकांसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पतीने पकडले.

तत्पूर्वी पतीने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना हॉटेलवर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी रुमचा दरवाजा उघडला तेव्हा महिलेसह तिचे २ प्रियकर आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. या तिघांनाही कुटुंबाने बेदम मारले. या जोडप्याचे लग्न २०१३ साली झालं होते. लग्नानंतर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं पतीला कळाले. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होता. ही महिला मागील १ वर्षापासून सासर सोडून माहेरी राहत होती. महिलेने पती आणि तिच्या सासरच्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कार्यवाही तपासानंतर केली जाईल असं पोलिसांनी सांगितले.