शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडनं Instagram वर प्रायव्हेट फोटो अपलोड केला; गर्लफ्रेंडनं घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 12:15 IST

डॉक्टर विकास यूक्रेनहून परतल्यानंतर एका खासगी रुग्णालयात काम करत होता. हत्येतील आरोपी युवतीसोबत तो लिव्ह इनमध्ये राहत होता.

बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे सोशल मीडियावर अश्लिल फोटो पोस्ट केल्यामुळे संतापलेल्या युवतीनं तिच्या लिव्ह इन पार्टनरचा भयंकर बदला घेतला आहे. मित्रांसोबत मिळून युवतीने तिच्यासोबत राहणाऱ्या विकासची हत्या केली आहे. ज्या युवकाची हत्या झाली तो व्यवसायाने डॉक्टर होता. तर आरोपी युवती ही आर्किटेक्ट आहे. 

डॉक्टर विकास आणि लिव्ह इन पार्टनर युवतीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी वाद झाला होता. काही दिवसांनी हे दोघं लग्न बंधनांत अडकणार होते. परंतु त्याआधीच युवतीने युवकाचा काटा काढला. मिळालेल्या माहितीनुसार, युवती आणि तिच्या आईचा न्यूड फोटो कुणीतरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर अपलोड केला होता. त्याचसोबत इतर मित्रांनाही पाठवला होता. 

युवतीने जेव्हा या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा तिच्यासोबत लिव्ह इन म्हणून राहणाऱ्या विकासनेच बनावट खाते बनवून ते फोटो अपलोड केल्याचं उघड झाले. १०  दिवसांपूर्वी युवती आणि विकासमध्ये या प्रकारावरून वाद झाला होता. त्यानंतर युवतीने तिच्या अन्य ३ मित्रांना बोलावून विकासचा काटा काढण्यासाठी प्लॅन बनवला. युवतीने तिच्या मित्रांना घरी बोलावलं आणि अश्लिल फोटोवरून चौघांनी विकासला मारहाण करण्यास सुरुवात केली. मॉब आणि बॉटलनं विकासला मारण्यात आले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असता तो कोमात गेल्याचं डॉक्टरांनी म्हटलं. त्यानंतर १४ सप्टेंबरला विकासचा मृत्यू झाला. विकासच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा होत्या. तो चेन्नईचा रहिवासी होता. 

डॉक्टर विकास यूक्रेनहून परतल्यानंतर एका खासगी रुग्णालयात काम करत होता. हत्येतील आरोपी युवतीसोबत तो लिव्ह इनमध्ये राहत होता. दोघांच्या कुटुंबाना याबाबत माहिती होती. या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी युवतीसह तिच्या २ सहकारी मित्रांना अटक केली आहे. तर अन्य १ जण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.