शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

त्या चिमुकलीची डीएनए तपासणी करा : उपसभापती निलम गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 21:07 IST

कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे रविवारी एका पाच वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या बालिकेची त्वरीत डीएनए तपासणी करण्याच्या सूचना आपण पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे  यांनी सोमवारी सांगितले.

ठळक मुद्देपोलीस अधिक्षकांना दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे रविवारी एका पाच वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. नेमकी त्या बालिकेची हत्या करण्याचे कारण काय? तिच्यावर आरोपीकडून अत्याचाराचा प्रयत्न तर झाला नाही ना? हे सर्व निष्पन्न होण्यासाठी त्या बालिकेची त्वरीत डीएनए तपासणी करण्याच्या सूचना आपण पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे  यांनी सोमवारी सांगितले.डॉ. गोऱ्हे  म्हणाल्या, अलिकडच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढीस आल्या आहे. महिला सुरक्षा व पायाभूत ससुविधांची निगराणी याबाबत रस्ते वाहतुक, हायवे अ‍ॅथॉरिटी, टोल प्लाझा देखरेख करतांना फक्त सीसीटीव्ही पुरेसे नसुन कॅमेरे ऑन लाईन व्हिजीलन्स माध्यमातून देखरेख करण्यात यावी. विशेषत: तेलंगणातील हायवेवरील घटना पाहिली तर महिला विरोधी गुन्हे घडू नयेत यासाठी या तंत्रज्ञान आणि यंत्रणेचा उपयोग सर्व टोल प्लाझा व द्र्रुतगती मार्गावर करून घेण्यात यावा. अशी देखील सूचना आपण पत्राच्या माध्यमातून मुख्यममंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

निर्भया फंड वापरण्यासाठी कृती आराखडा तयार व्हावा       निर्भया फंडाचे पैसे खर्च होत नसल्याच्या तक्रारी वारंवार मिळत आहेत. हा निधी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच निर्भया फंड वापरण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली असल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. नागपूर पोलिसांच्या उपक्रमाची प्रशंसामहिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. शहरातील कुठल्याही एरियात रात्री ९ नंतर एकट्या महिलेला घरी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन मिळत नसेल, तर त्या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षातील भ्रमणध्वनी क्रमांक डायल केल्यास पोलीस तिच्या मदतीला धावून येतील आणि तिला सुखरुप घरी पोहचवतील, असा उपक्रम सुरू केला आहे. नागपूर पोलिसांनी सूरू केलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारMurderखून