शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर जैन महाविद्यालयात अभाविपने घातला गोंधळ, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 02:17 IST

Digambar Jain College : जैन समुदायाने महाविद्यालय व्यवस्थापन समितीला याबाबत निवेदन दिले देत अभाविपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली.

मेरठ : उत्तर प्रदेशातील बागपत शहरातील दिगंबर जैन महाविद्यालयातील माता श्रुती देवी (जिनवाणी) यांची प्रतिमा विवादित असल्याचे सांगत अ. भा. विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर टाळेबंदी केल्यानंतर जैन समाजातील लोकांनी गुरुवारी मोर्चा काढत निषेध केला. जैन समुदायाने महाविद्यालय व्यवस्थापन समितीला याबाबत निवेदन दिले देत अभाविपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली. अभाविपचे कार्यकर्ते ही प्रतिमा हटवून तिथे सरस्वतीची प्रतिमा स्थापन करण्याची मागणी करत होते.  महाविद्यालयात तोडफोडीचा प्रयत्न, विद्यार्थ्यांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी प्राचार्य डॉ. वीरेंद्र सिंह यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, ही प्रतिमा २०१६ मध्ये महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षात स्थापन करण्यात आली होती. 

ट्विटरवर मागितली माफीअभाविपने ट्विटरवरून दिगंबर जैन समाजाची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिगंबर जैन शिक्षण संस्था, बागपत येथे प्रतिमेबाबत झालेल्या आंदोलनासाठी अभाविप दिगंबर जैन समाजाची माफी मागत आहे. तसेच, हेही स्पष्ट करू इच्छितोत की, ही घटना अज्ञानातून व प्रमुख कार्यकर्त्यांना माहिती नसताना झाली. अभाविप या घटनेचे अजिबात समर्थन करत नाही.