शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

वाहने चोरणाऱ्यास पोलिसांनी धुळ्यात केली अटक, ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

By अतुल जोशी | Updated: March 1, 2023 17:35 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अतुल जोशी, धुळे: शहरासह अन्य भागातून चारचाकी व दुचाकी चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पकडले. त्याच्याजवळून दोन चारचाकी व एक दुचाकी असा एकूण ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. देवपुरातील त्रिमूर्ती सोसायटीतील रहिवासी अमृत अर्जुन पाटील यांच्या मालकीची घरासमोर लावलेले चारचाकी वाहन (क्र. एमएच १८ - व्ही ३०१९०) २१ फेब्रुवारी रोजी चोरीस गेले होते. या प्रकरणी देवपूर पोलिस स्टेशनला २५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतर्फेही सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना चाळीसगाव रोडवरील शाहरूख अब्बास खाटीक (वय २६, रा. जामचा मळा, धुळे) याने त्याच्या अन्य एका साथीदारासह चारचाकी वाहनाची चोरी केल्याची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान, शाहरूख खाटीक हा चारचाकी वाहनासह चाळीसगाव रोड चौफुलीवर उभा असल्याची माहिती मिळाली.

पोलिस निरीक्षक हेमंत पाटील पथकासह तिकडे रवाना झाले. त्यावेळी शाहरूख खाटीक हा वाहनासह चाळीसगाव रोड चौफुलीवर उभा होता. त्यास ताब्यात घेतल्यावर त्याने अन्य ठिकाणी केेलेल्या वाहन चोरीची माहिती पोलिसांना दिली. धरणगाव (जि. धुळे) येथून चोरीस गेलेली स्कार्पिओ (क्र. एमएच ०६ - डब्ल्यू ६२०१) व दुचाकी (क्र. एमएच ४१ - एम २०१३) पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केली. या तीनही वाहनांची एकूण किंमत ३ लाख ४० हजार रुपये एवढी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे