शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड काेटींच्या फसवणूक प्रकरणी एका आरोपीला कोठडी; लातूरचे पोलीस पथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 23:00 IST

तपासाची चक्र गतिमान करत एकाला गेल्या आठवड्यात चेन्नई शहरातून उचलण्यात आले.

लातूर : येथील एका व्यापाऱ्याला १०० काेटींचे कर्ज मिळवून देताे, असे आमिष दाखवत कमिशनपाेटी १ काेटी ५२ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या समीर कादरी ऊर्फ आर.के. रमण (रा. चेन्नई, तामिळनाडू) याला लातूरच्या न्यायालयात गुरुवारी दुपारी हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी धनराज नरसिंगदास पल्लाेड (४४, रा. मैत्री पार्क, लातूर) यांना व्यापारासाठी १०० काेटी रुपयांच्या कर्जाची गरज हाेती. त्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपयांना गंडविल्याची घटना घडली होती. दरम्यान, याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात चेन्नई येथील सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची चक्र गतिमान करत एकाला गेल्या आठवड्यात चेन्नई शहरातून उचलण्यात आले. त्याला ५ ऑगस्ट रोजी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपीच्या पोलीस कोठडीचा कालावधी बुधवारी संपल्याने पोलिसांनी गुरुवारी दुपारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, असे लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी सांगितले.

अन्य पाच साथीदारांचा  पथकाकडून शोध सुरुच...

या गुन्ह्यातील फरार असलेल्या आदित्य राम उर्फ इ हरिप्रसाद, जिन्ना कादरी उर्फ अब्दुल्ला उर्फ सुलतान, नरसिंम्हन रामदाेस उर्फ विनाेथ, व्ही. एम. माेहम्मद दाउद खान आणि माेहम्मद अली (सर्व रा. चेन्नई, तामिळनाडू) यांच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असेही उपविभागीय पोलीस अधिकारी जगदाळे म्हणाले.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस