शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दारूने केला विनाश; मामा-भाच्याने केलेल्या मारहाणीत मद्यपी पित्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 18:36 IST

वडिलांच्या दारू पिण्याला होता विरोध

ठळक मुद्देमामा - भाच्यावर खुनाचा गुन्हा दाखलआरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी :

अंबाजोगाई : वडील सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने संतापलेल्या मुलाने मामाच्या मदतीने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर झालेल्या वडिलांचा दुसऱ्या दिवशी (दि.०५) मृत्यू झाला. परळी तालुक्यातील वानटाकळी येथील या प्रकरणात मुलासह मामावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.  विलास रामराव मुंडे (वय ४७, रा. वानटाकळी, ता. परळी) असे मुलाच्या मारहाणीत मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची मुलगी निशिगंधा हिने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे कि, शुक्रवारी (दि.४) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ती, आई, भाऊ ऋषिकेश आणि वहिनी हे सर्व जेवण करून घरात बसले होते. यावेळी तिचे वडील विलास हे दारू प्राशन करून आले आणि घरासमोर उलट्या करू लागले. हे पाहून विलास यांचा मुलगा ऋषिकेशचा पारा चढला. त्याने मामा भागवत साहेबराव हांगे यास बोलावले. दारू पिऊन सतत त्रास का देतोस असे म्हणत त्या दोघांनी विलास यांना लोखंडी पाईप आणि काठीने पाठीवर, पोटावर बेदम मारहाण केली.

यावेळी आई, मुलीने मध्यस्थी करत विलास यांना सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु संताप अनावर झालेल्या मामा-भाच्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत बाजूला काढले. थोड्यावेळाने दोघेही तिथून गेले. त्यानंतर जखमी अवस्थेतील विलास यांनी संपूर्ण रात्र बाजूच्याच गिरणीत काढली. दुसऱ्या दिवशी (दि.५) सकाळी ६ वाजता निशिगंधाने वडिलांना चहा दिला आणि त्यांची अवस्था पाहून रुग्णालयात जायचे का असे विचारले. परंतु, विलास यांनी त्यास नकार दिला. दुपारी २ वाजताच्या सुमारास विलास यांची तब्येत अधिकच खालावली. त्यामुळे पत्नी शिवकन्या आणि मोठा मुलगा विकास यांनी त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे दुपारी ०३.५५ वाजता डॉक्टरांनी विलास यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतरही दोन्ही आरोपींनी झालेल्या घटनेबद्दल कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी कुटुंबियांना दिली. तरीदेखील निशिगंधाने हिम्मत करून पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून ऋषिकेश विलास मुंडे आणि भागवत साहेबराव हांगे या मामा-भाच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पीएसआय व्ही.बी. केंद्रे करत आहेत. सहा दिवसांची पोलीस कोठडी :गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताबडतोब अटक केली. त्यांना बुधवारी (दि.९) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनBeedबीड