शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याला मारण्यासाठी कोर्टात ठेवला बॉम्ब, DRDOच्या शास्त्रज्ञाला पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 15:49 IST

9 डिसेंबरला दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट झाला होता. हा स्फोट DRDOच्या शास्त्रज्ञाने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट (Rohini Court Blast) झाल्याची घटना घडली होती. तो स्फोट कमी तीव्रतेचा असला, तरी एकजण जखमी झाला होता. तसेच, स्फोटामुळे जमिनीत खड्डाही पडला होता. त्या प्रकरणात आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(DRDO) एका शास्त्रज्ञाने हा स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

9 डिसेंबर रोजी दिल्लीतील रोहिणी जिल्हा न्यायालयातील कोर्ट रूम नंबर 102 मध्ये सकाळच्या सुमारास एक स्फोट झाला होता. त्या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाला होता. टिफीन बॉक्समध्ये आयईडी ठेवून हा स्फोट घडवून आणला होता. या प्रकरणी पोलिसांनी डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या शास्त्रज्ञाने त्याच्या शेजाऱ्याला मारण्याच्या उद्देशाने हा आयईडी स्फोट घडवून आणला होता. 

त्या दिवशी नेमकं काय झालं ?याप्रकरणी आरोपी भारतभूषण कटारिया (47) याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, डीआरडीओमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ कटारिया याने घटनेच्या दिवशी सकाळी 9.33 वाजता दोन पिशव्या घेऊन कोर्टात प्रवेश केला आणि कोर्ट रुम नंबर 102 मध्ये एक बॅग ठेवली. त्यानंतर सकाळी 10.35 वाजता न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडला. त्यानंतर स्फोट झाता होता, सीसीटीव्ही फुटेजमधून हा खुलासा झाला आहे.

शेजाऱ्याला मारण्यासाठी ठेवले आयईडीकटारियाने स्फोटके न्यायालयाच्या खोलीत टिफिनमध्ये ठेवली होती. त्याचे वकील असलेल्या आपल्या शेजाऱ्याशी वाद आहेत. त्या दोघांनी एकमेकांविरोधात अनेक गुन्हे दाखल केलेली आहेत. या वैरातूनच शेजाऱ्याला ठार मारण्यासाठी कटारियाने हा कट रचला होता. स्फोटानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना आयईडी बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले होते.

टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटCourtन्यायालय