शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२६ वर्षीय युवतीच्या हत्येचं रहस्य उलगडेना; बॉयफ्रेंडही झाला फरार, पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 11:23 IST

शिवमला भेटण्यासाठी युवती घराबाहेर पडली. युवतीने तिच्यासोबत ६२ हजार रुपये घेतले होते.

नवी दिल्लीदिल्लीच्या IGI एअरपोर्टसमोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये २६ वर्षीय युवतीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. २७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सर्व्हिस बॉय रुममध्ये गेला असता त्याने युवतीचा मृतदेह पाहिला त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाला हा प्रकार सांगितला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावरुन युवतीसोबत आलेला युवक तिथून फरार झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, युवती आणि तिचा बॉयफ्रेंड शिवम चौधरी दोघं हॉटेलच्या रुमनंबर २०३ मध्ये थांबले होते. २५ फेब्रुवारीपासून दोघंही हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. घटनास्थळी दारुची बॉटल आढळली. ही युवती बिहारच्या किसनगड परिसरातील आहे. ती घरात ५ भावंडांपैकी सगळ्यात लहान आहे. मृत युवतीच्या घरच्यांनी सांगितले की, मागील ४ वर्षापासून युवती गाझियाबाद येथील शिवम चौधरी नावाच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. युवतीच्या घरच्यांना ही बाब माहिती होती. अनेकदा घरात सांगून ती शिवमला भेटायला जायची.

२५ फेब्रुवारीला असचं घडलं. शिवमला भेटण्यासाठी युवती घराबाहेर पडली. युवतीने तिच्यासोबत ६२ हजार रुपये घेतले होते. १५ फेब्रुवारीपासून युवतीचा फोन बंद होता. ती शिवमसोबत असल्याने सुरक्षित असेल असं घरच्यांना वाटलं. परंतु यावेळी कुटुंबाचा अंदाच चुकला. २७ फेब्रुवारीला संध्याकाळी पोलिसांचा फोन येताच युवतीच्या घरच्यांना मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला.

या घटनेची माहिती मिळताच कुटुंब घटनास्थळी पोहचले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मृत युवतीच्या बहिणीने शिवमवर हत्येचा आरोप लावला आहे. युवती शिवमसोबत लग्न करणार असल्याचं सांगत होती. परंतु शिवम लग्नाची गोष्ट टाळत होता. त्यामुळेच तिची हत्या झाल्याचा संशय बहिणीनं व्यक्त केला आहे. युवकाने पैशाच्या लालसेपोटी ही हत्या केल्याचं कुटुंबीयांचे म्हणणं आहे. युवतीच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याचं दिसून येत आहे. पोस्टमोर्टमसाठी मृतदेह हॉस्पिटलला पाठवला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक टीम बनवल्या आहेत.

पोलिसांचे पथक अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. त्याशिवाय हॉटेलच्या स्टाफशी चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर हॉटेल सील करण्यात आले आहे. युवतीचा मृत्यू अखेर झाला कसा? या उलगडा करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. शिवमनेच युवतीची हत्या केली का? शिवम फरार का झालाय? त्याचा शोध घेण्याचा आणि हत्येचं रहस्य उघड करण्यासाठी पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत.

टॅग्स :delhiदिल्ली