शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीतील प्रियकरास अटक; मीरा रोड पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 01:26 IST

मुख्य भूमिकेचे दाखवले होते आमिष

मीरा रोड : मीरा रोडमध्ये राहणाऱ्या सेजल शर्मा या मालिका व जाहिरातीत काम करणाºया अभिनेत्रीने जानेवारीत केलेल्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीत राहणाºया प्रियकरास मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. आपल्याकडे अद्भुत शक्ती असून तिचा वापर करून मुख्य भूमिका मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखवले होते. ठाणे न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मीरा रोडच्या शिवार उद्यान परिसरातील रॉयल नेस्ट इमारतीच्या दुसºया मजल्यावर राहणाºया सेजल शर्मा (२४) हिने २४ जानेवारी रोजी बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दिल्लीतील तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ (३०) यानेच पोलिसांना फोन करून सेजलने आत्महत्या करणार असल्याचे सांगितल्याचे कळवले होते. पहाटे पोलिसांनी सेजलच्या घरी धाव घेतली असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कुणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले होते. परंतु, सेजलच्या आईने पोलिसांना तक्रार करून आदित्य आणि सेजलमध्ये भांडणे होत असल्याचे सांगितले होते. सेजल आत्महत्या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम व मीरा रोड पोलिसांनी केला.