शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 06:43 IST

एनसीबीकडून आज चौकशी; करिश्माने ड्रग्ज संवादाबाबत दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर, क्वॉन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश यांच्या व्हायरल झालेल्या २०१७च्या ड्रग्ज चॅट ग्रुपची दीपिका अ‍ॅडमिन असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, शनिवारी अमली पदार्थ नियंत्रक विभाग (एनसीबी) दीपिकाकडे याबाबत चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दीपिकाने स्वत: २०१७ मध्ये याच ग्रुपमधून ड्रग्जची मागणी केली होती. बॉलीवूडमधील तारेतारकांना चित्रपट आणि जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहा जया साहा आणि करिश्मा प्रकाशही या ग्रुपमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी करिश्माकडे याबाबत एनसीबीने चौकशी केली. तिने या ड्रग्ज संवादाबाबत कबुली दिल्याचेही समजते.

‘माल है क्या?’, असा सवाल दीपिकाने केला होता. यात माल म्हणजे नेमके काय? अशाच अनेक प्रश्नांबाबत करिश्माकडे चौकशी करण्यात आली. शनिवारी या ग्रुपसह या संवादातील ड्रग्जबाबत दीपिकाकडे चौकशी करण्यात येईल.वकिलाचे आरोप ‘एम्स’च्या डॉक्टरांनी फेटाळलेच्सुशांतसिंह राजपूतची गळा दाबून हत्या केल्याची माहिती एम्सच्या डॉक्टरांकड़ून मिळाल्याची माहिती सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृत्युनंतर बहीण मीतूने काढलेले फोटो एम्सच्या एका डॉक्टरांना शेअर केले होते. त्यावरून सुशांतची २०० टक्के गळा दाबून हत्या झाल्याचे त्यांनी सांगितले. ते सध्या सीबीआयकडून तपास सुरू असलेल्या एम्सच्या पाच डॉक्टरांपैकी एक आहेत. सीबीआयचे पथक या डॉक्टरांची भेट घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, एम्सचे फॉरेन्सिक प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी अ‍ॅड.विकास सिंह यांचे आरोप फेटाळून लावले.च्सीबीआयने आतापर्यंत काय तपास केला, हे कळायला मार्गच नाही. तपास संथ गतीने सुरू आहे किंवा पुढे सरकत नाही, ड्रग्ज प्रकरणामुळे मृत्यूचा तपास भरकटल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाच्या वतीने वकील सिंह यांनी केला.

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणDrugsअमली पदार्थSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत