शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या मारहाणीत संशयित चोरट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 09:57 IST

सानपाड्यातील घटना : मोबाइल चोरल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मोबाइल चोरीच्या संशयातून नागरिकांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सानपाडा येथे घडली. हा तरुण मोबाइलचोर असून यापूर्वीही परिसरात टेहळणी करताना नागरिकांनी पाहिले होते. त्यावरून मंगळवारी दुपारी तो जमावाच्या हाती लागला असता झालेल्या मारहाणीत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

ललित गोयल (२७) असे मृत झालेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. तो शिरवणे परिसरात राहणारा असून मंगळवारी दुपारी सानपाडा गाव परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होता. यावेळी काही नागरिकांना त्याच्या हालचालीवर संशय आला. काहींनी यापूर्वीही त्याला परिसरात टेहळणी करताना पाहिले होते. यामुळे जमावाने त्याला ताब्यात घेऊन चोप देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला चोर पकडल्याची माहिती दिली. त्यामुळे सानपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, ललित हा गंभीर अवस्थेत भिंतीलगत टेकून बसलेला होता.  यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

ललितला व्यसन ललित याला दारूचे व्यसन असून घटनेवेळीही तो नशेत व उपाशी होता, असेही सांगण्यात आले. त्यामुळे मारहाण असह्य होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित जमावावर गुन्हा दाखल झाला असून सानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.