पिंपरी : खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्याने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी वाकड येथील जगताप डेअरी परिसरात घडली.अरुण मनोज विश्वकर्मा (वय ३, रा, क्षितीज कॉलनी, चामुंडा मार्बल जवळ, जगताप डेअरी, वाकड) असे या चिमुकल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अरुण घरासमोर खेळत होता. त्यावेळी तो खेळता खेळता जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला. तोल गेल्याने अरुण पाण्याच्या टाकीत पडला. ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत त्याला बाहेर काढले. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध पडला होता. उपचारासाठी त्याला तातडीने औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पाण्याच्या टाकीत पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 17:25 IST